जत,प्रतिनिधी : जतच्या पुर्व भागातील दुष्काळ हटविणारी महत्वपुर्ण सिंचन योजनाच्या कामास गती यावी यासाठी कॉग्रेस नेते विक्रमसिंह सांवत यांनी मुंबई येथे महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली.पुर्व भागातील आंतरराज्यीय तुरची-बबलेश्वर पाणी योजनेच्या विविध विषयावर यावेळी चर्चा केली. कर्नाटक व महाराष्ट्र शासनाच्या भुमिकाच्या यावेळी माहिती देण्यात आली.त्यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले कि,लवकरात लवकर कर्नाटक जलसंपदा मंत्री एम.बी.पाटील यांची भेट घेऊन तुरची बबलेश्वर योजनेच्या कामाचा प्रश्न मार्गी लाऊ असे आश्वासन महाजन यांनी दिल्याचे सांवत यांनी सांगितले. यावेळी सांगलीचे खासदार संजय पाटील, सांगली कृ.उ.बा.स.सांगलीचे संचालक दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर,डाळीब व्यापारी नामदेव बजबळकर उपस्थित होते.
Home Uncategorized कॉग्रेस नेते विक्रमसिंह सांवत यांची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी तुरची-बबलेश्वर पाणी...





