बिंळूर,उमराणी दोन घटनात किरकोळ कारणावरून हाणामारी

0

जत,प्रतिनिधी : बिंळूर ता.जत येथील शेतातील रस्त्याच्या दुरूस्थीला लागणाऱ्या खर्चाच्या पैशावरून दोघा भावांना कुऱ्हाड व काठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली. त्यात मलकाप्पा भिमू बिंळूर व त्याचे भाऊ शिवलिंग भिमू बिंळूर (दोघे रा.बिंळूर)हे दोघे मारहाणीत जखमी झाले आहेत.सोमवारी सायंकाळी  साडेसातला घटना घडली. याबाबतचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी,बिंळूर गावाच्या हद्दीत बिंळूर व कामगोंडा या मामा-भाच्यांची जमिन आहे.यातील सामुहिक रस्ता जेसीबीने करण्यात आला आहे.मात्र या खर्चातील 500 रुपये दिले नाहीत.या कारणावरून कामगोंडा यांच्यातील तिघांनी मलकाप्पा व शिवलिंग बिंळूर यांना काठ्या,कुऱ्हाड्यांनी मारहाण केली.जखमींना जत ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी मलकाप्पा बिंळूर यांनी फिर्याद दिली.केंसाप्पा परगोंडा कामगोंड,गुराप्पा परगोंडा कामगोंड व आप्पासो केसाप्पा कामगोंड सर्वजण, रा.बिंळूर यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पिएसआय आप्पासाहेब कत्तो करत आहेत.दरम्यान उमराणी ता.जत येथे द्राक्ष बागेतील पैशाच्या देवाण-घेवाणीतून पाच जणांना काळी,सळीने मारहाण करून जखमी करण्यात आले आहे. याबाबतचा गुन्हा दाखल झाला आहे. विजय मुरग्याप्पा यळमळी,वडील मुरग्याप्पा यळमळी, भाऊ सुशांत यळमळी, चुलत भाऊ रावसाहेब यळमळी हे जखमी झाले आहेत.घटना शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास यळमळी वस्तीवर घडली.

Rate Card

याप्रकरणी विजय यळमळी यांच्या फिर्यादीवरून शिवानंद गिरमल्ला यळमळी, राघवेंद्र गुरूलिंगा यळमळी, बिरूलिंगा रामगोंड यळमळी, मल्लिकार्जून गिरमल्ला यळमळी, संगोडा बसगोंडा यळमळी, सिध्दगोंडा बसगोंडा यळमळी सर्व रा.यळमळी वस्ती,उमराणी या सहा जणाविरोधांंत गुन्हा दाखल केला आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.