छावण्या प्रकरण : जत तालुक्यातील अन्य 6 छावण्या चालकावर गुन्हे दाखल

0

जत,प्रतिनिधी: तालुक्यात सन 2012-14 या काळात चालू असलेल्या चारा छावणीत घोटाळा झाल्याने नुकतेच 24 छावणी चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी पुन्हा तहसिलदार अभिजित पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  6 छावणी चालक व संस्थावर गुन्हा दाखल केला आहे.

दुष्काळी परिस्थिती काळात शासनाने छावण्यांना मंजूरी देताना सुविद्या देण्याबाबत संबधित छावणी चालकांकडून बंधपत्र घेतले होते.तरीही छावणी चालकांकडून मनमानी करून अटीचा भंग केला होता.त्याविरोधात सांगोल्यातील एका समाजसेवकांना याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने निकाल देताना संबधित संस्था व चालकावर गुन्हे दाखल करून चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारीच्या आदेशावरून जत तालुक्यातील आता 30 छावण्या चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर संस्था काळ्या यादीत टाकल्या आहेत.

Rate Card

मंगळवारी गुन्हा दाखल झालेल्या संस्था व चालक 

श्रीराम चँरिटेबल ट्रस्ट दरिबडचीचे अमोगसिध्द विराप्पा शेंडगे,जत तालुका खरेदी विक्री संघ जतचे सुजय अशोकराव शिंदे, सिध्देश्वर ग्रामीण बिगरशेती पंतसस्था कुंभारीचे दाजी आण्णाप्पा पाटील, श्री.काळभैरव विविध कार्यकारी सेवा संस्था बिंळूरचे आण्णाजी भाऊराव कुलकर्णी,श्री. धान्नाम्मा देवी विकास सेवा सोसायटी गुड्डापूरचे सिद्राया काशिराम पाटील, भैरवनाथ मजूर सह.संस्था कोळीगिरीचे जगदेव वसाप्पा माळकोटगी या संस्था चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.