दुष्काळीतील छावण्याची मलई चव्हाट्यावर जनावरांच्या हाल आपेष्टाची छावणी चालकांना किंमती चुकवावी लागली

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात दुष्काळी स्थितीत जनावरांना जगविण्याच्या उद्देशाने अनेक गावात चालू केलेल्या छावण्यातील भष्ट्राचार झाल्याचे छावणी चालकांवर गुन्हा दाखल सत्य झाले आहे.

त्यामुळे दुष्काळाचा फायदा घेऊन छावणीतील मलई खाणारे चव्हाट्यावर आले आहेत.

Rate Card

तीव्र दुष्काळी परिस्थितीत जनावरांचे चाऱ्याविना हाल होत होते. त्या पाश्वभूमीवर शासनाने विविध संस्था मार्फत छावण्या चालविण्यास परवाणगी दिली होती. परवाणगी देताना कुपण/गव्हाण आदि सोयी पुरविण्याचे बंधपत्र घेण्यात आले होते. तरीही छावणी चालकांनी सर्व नियम धाब्यावर बसवून छावण्या चालविल्या होत्या.जनावरांचा आकडा फुगवून बोगस बिले काढल्याचे आरोप आहेत. जनावरांना चारा म्हणून वाळलेला ऊस देणे,पेड न देणे,सुविधा नसल्याने कुठेही उघड्या मैदानात जनावरे बांधून जनावरांसह शेतकऱ्याचे हाल केले होते.शेणातूनही लाखो रुपये छावणी चालकांनी हडपल्याचे आरोप आहेत. त्यावेळीही अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यातील काही छावणी चालकांनी दहशतीने तर काही आर्थिक आमिषाने दाबल्या होत्या. त्याला अर्थपुर्ण सहयोगाने जत महसूल विभागाने साथ दिली होती. त्यामुळे सर्वत्र “आल इज वेल” झाले होते. पाऊस पडल्याने छावण्या बंद झाल्या. बरीच बिले मिळाल्याने छावणी चालकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. शेवटची काही बिले थकली आहेत. मात्र प्रंचड उत्पन्न मिळाल्याने छावणी चालकांनी ती द्यावित असा तगादाही लावला नाही. पंरतू एका समाजसेवकांना यांची वास्तव परिस्थितीची परिस्थितीजन्य पुराव्यासह मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर निकाल देताना न्यायालयाचे सरकारला चौकशीचे आदेश दिले होते. त्यावरून महसूल विभागाने सर्व तालूक्यातील छावणी चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर संस्था काळ्या यादीत टाकल्या आहेत. महसूल विभागाने केलेली कारवाई समाधानकारक असली तरी छावण्या चालू काळातील तक्रारीवर जर अशा कारवाया केल्या असत्या तर ही परिस्थिती उद्भवली नसती. ऐन दुष्काळात जनावरांबरोबर शेतकऱ्यांना नरकयातना भोगाव्या लागल्या. त्यांची ही उतरनं आहे.पुढे कारवाई काहीही होऊ भष्ट्राचार झाल्याचे स्पष्ट झाले हे विशेष..आणि प्रशासनाला गुन्हे दाखल कऱणे भाग पडले आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.