उच्च शिक्षित विवाहतेचा पोलिस ठाणे आवारात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न पोलिसांच्या सतकृत्तेमुळे प्राण वाचले ; नवरा सासू,नणंद सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल

0

जत, प्रतिनिधी: सासू-सासरे छळ करतात. व नवरा नांदवत नाही म्हणून कंटाळलेल्या एका उच्च शिक्षित विवाहितेने जत पोलीस ठाण्याच्या आवारातच विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या तत्परतेमुळे तिचे प्राण वाचले.तिच्यावर जत येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असून प्रकृत्ती ठीक आहे.याबद्दल आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा पती,सासू,  सासरा व नणंदेच्या विरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  पुजा सुनिल चव्हाण (वय -23) असे विवाहितेचे नाव आहे.  तिचे मुळ गाव  मानखुर्द, मुंबई आहे. तर सासर जत तालुक्यातील लोहगाव आहे.दुपारी अचानक घडलेल्या या प्रकाराने पोलिसांची मोठी धावपळ झाली.पूजा व पती सुनिल, सासू सासरे यांच्यात दोन वर्षापासून वाद सुरू आहेत. दोघांनीही परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी हा कौटुंबिक वाद मिटविला होता.पुन्हा वाद झाल्याने पूजा तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आली होती.

तक्रार देऊन बाहेर आल्यानंतर ठाण्याच्या आवारातच तिने विषारी औषध प्राशन केले.  पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांना एका कर्मचाऱ्यांनी हा प्रकार सांगताच त्यांनी तातडीने तिला रूग्णालयात दाखल केले.  त्यामुळे तिचे प्राण वाचले.याप्रकरणी तिचा पती सुनिल चव्हाण, सासरा रामचंद्र ईश्वर चव्हाण, सासू अाक्काताईव रामचंद्र चव्हाण व 

Rate Card

नणंद माया सुभाष कोडग, सर्व रा.लोहगाव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान गेल्या दोन वर्षापासून लग्न झाले आहे. नवरा नांदवत नाही, सासू सासरे जाच करतात. त्यामुळे वैतागून असे विवाहतेचे म्हणणे आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.