जिल्ह्यातील 148 चारा छावणी चालकांवर गुन्हा दाखल – – अनियमितता व अटी, शर्तींचा भंग केल्याप्रकरणी कारवाई

0

सांगली : सन 2012-13 आणि सन 2013-14 मध्ये चारा छावणी अनियमितता व अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील 148 चारा छावणी चालकांवर एफ. आर. आर. दाखल करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाने केली आहे. याप्रकरणी त्या त्या वर्षात चारा छावण्यांची तपासणी केली असता अनियमितता आढळल्याप्रकरणी जवळपास 10 कोटी रुपयांची वसुली चारा छावणी देयकातून करण्याची कार्यवाही यापूर्वीच केली होती. तथापि, राज्य शासनाच्या आदेशानुसार चारा छावणी चालक / चारा डेपो संस्था चालक यांच्यावर एफ. आय. आर. दाखल करण्याचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली. जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड उपस्थित होते.

Rate Card

जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, सन 2012-13 आणि सन 2013-14 मध्ये सांगली जिल्ह्यातील जत, कडेगाव, मिरज, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ आणि आटपाडी असे 7 तालुके टंचाईग्रस्त होते. त्यावेळी त्या त्या तालुक्यात चारा छावण्या / चारा डेपो सुरू करण्यात आले होते. मात्र, त्या त्या वर्षात केलेल्या तपासणीनुसार टॅगिंग नसणे, बार कोड नसणे, निवारा नसणे, जनावर संख्येमध्ये तफावत असणे अशा अनेक त्रृटी आढळल्या होत्या. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या अटी व शर्तींचा भंग करण्यात आल्याचे आढळल्याने संबंधितांच्या देयकामधून जवळपास 10 कोटी रुपये कपात करण्यात आले होते. मात्र, शासनाच्या निर्देशांनुसार फौजदारी स्वरूपाची कार्यवाही संबंधितांविरूध्द करण्यात आली.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.