उमदी, वार्ताहर : उमदी ता.जत येथे संख अप्पर तहसिल कार्यालयाचे आठवड्यातून दोन दिवस कामकाज चालणार आहे. तसे शासनाचे आदेश आल्याने उमदीत विजत्सोव साजरा करण्यात आला. फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.
नुकतेच संख येथे अप्पर तहसिल कार्यालयाचे कामकाज सुरू झाले आहे. त्याला मंजूरी मिळण्या अगोदर पासून उमदी करांचा तीव्र विरोध होता. तीव्र अंदोलन करण्यात आले होते. न्यायालयातही दाद मागण्यात आली होती. शिवाय ग्रामपंचायत निवडणूकीत दोन वेळा बहिष्कार टाकला होता. कार्यालय न झाल्यास यापुढच्या सर्वच निवडणूकावर बहिष्कार टाकण्याचा इशारा उमदीकरांनी दिला होता. त्या पाश्वभुमीवर शासनाने यांची दखल घेत संख तहसिल कार्यालयाचे दोन दिवस कामकाज उमदीत चालवावे असे आदेश उपसचिव कि.पा.वडते यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत. उमदी मंडल कार्यालयात यापुढे दोन दिवस अप्पर तहसिल कार्यालयाचे कामकाज चालणार आहे. या निर्णायाचे उमदीसह परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.



