जत शहराच्या पाणी-पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करा : गायत्रीदेवी शिंदे

0

जत,प्रतिनिधी: जत शहरातील पाणी टंचाई वाढत आहे. अनेक भागात पुर्ण क्षमतेने पाणी येत नसल्याने नागरिकांतून असंतोष वाढत आहे. त्यामुळे बिरनाळ पाणी-पुरवठा योजनेची किरकोळ दुरूथ्या करावी, जेणेकरून उपलब्धं पाणी नागरिकांना व्यवस्थित मिळेल.अशी मागणी नगरसेविका गायत्रीदेवी सुजय शिंदे यांनी निवेदनांद्वारे नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.

Rate Card

निवेदनात त्यांनी काही उपाययोजना सुचविल्या आहेत.

सध्याच्या योजनेतील सध्याच्या अडचणी

*अस्तित्वातील पाणी पुरवठा प्रणालीची क्षमता शहराच्या लोकसंख्येनुसार तोडकी आहे.
*सध्याची पाणी पुरवठा प्रणालीचा पुर्ण क्षमतेने वापर होत नाही.(अंदाजे 70 टक्के क्षमतेचाच वापर होतो).
*बिरनाळ तलावावरील पुर्ण अवस्थेतील जॅकवेल,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या ताब्यात वापराविना आहे.

सर्व शहरास मुबलक व योग्य दाबाने पाणी-पुरवठा करणेकामी दीर्घकालीन व मोठ्या उपाययोजना करणे महत्वाचे आहे. त्यांचा स्वंतत्र अभ्यास करून आमच्याकडून प्रशासनाला लवकरच अहवाल देणार आहोत.पण त्याआधी अस्तित्वातील व पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा पुर्ण क्षमतेने होण्यासाठी काही उपाययोजना अशा आहेत.

काही महत्वपुर्ण उपाययोजना

*पाईपलाईन सुमारे दहा ठिकाणी असलेली गळती त्वरित थांबविणे,

*बिरनाळ तलाव,विहिरीवर 100 अश्वशक्तीचे दोन पंप आहेत. 

*त्यांपैंकी सध्या एकच पंप सुरू आहे.दुसरा बंद अनेक दिवसापासून बंद आहे.

त्यांची दुरूस्थी करून दोन्ही पंप सुरू करणे गरजेचे आहे.* अन्यथा चालू पंप बंद पडल्यास पाणी पुरवठा पुर्णत: खंडीत होण्याची भिती आहे.*विहिरीला विजपुरवठा करणारे पँनेल बोर्ड फ्जूज,इ.साहित्य नसल्याने थेट विजपुरवठा केला आहे.*त्यामुळे शॉर्टसक्रिटची शक्यता नाकारता येत नाही. *कर्मचाऱ्यांच्यासाठी हि स्थिती धोकादायक आहे.*प्राधिकरणचा जँकवेल ताब्यात घेऊन विहिरीतील यंत्रणा जँकवेलवर स्थालांतरीत करावी;*त्यामुळे सक्शन हेड साधारण 30 मीटरने कमी होऊन डिसचार्ज वाढेल व विद्युत बिलही कमी येईल.

अशा काही सुचना लोकप्रिनिधी म्हणून आम्ही प्रशासनाच्या निर्देशनास आणून देत आहोत. त्यावर गांभिर्याने विचार करून नियोजन करावे असेही निवेदनात शेवटी म्हटले आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.