जिरग्याळ तलावासाठी निर्णायक लढा शेतकरी आक्रमक :तलाव प्रश्नी प्रशासन,लोकप्रितिनिधीची मार्चच्या पहिल्या आठवड्यात महत्वपुर्ण बैठक

0

डफळापूर, वार्ताहर : जिरग्याळ ग्रामपंचायत हद्दीत गावाला वरदान ठरणाऱ्या जिरग्याळ तलाव आता पर्यत शेतकऱ्यांना मगजळ ठरला होता.गेल्या सत्ताधिशानी तलाव कामासाठी दुर्लक्ष केल्याने गेल्या सात वर्षापासून तलावाचे काम रखडलेच शिवाय जमिनी गेलेल्या पिडीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.न्यायालयीन बाब म्हणून प्रशासनाने बेदखल केले. त्यामुळे आजतागायत तलावची सांड न तुंबल्याने अर्धवट काम बघण्याची वेळ जिरग्याळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे.सततचा दुष्काळाशी सामना करत वैतागलेले शेतकरी आता आक्रमक झाले आहेत.यासाठी जलदूत राजेंद्रसिह राणा यांच्या जलबिरादरीच्या वतीने पुढाकार घेतला आहे.जलबिरादरीच्या नरेंद्र चुग व राणा यांचे चिरजिंव मौलिक राणा यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी यांची लोकप्रिनिधी व ग्रामस्थांसह भेट घडवून आणत व्यथा मांडली. जिल्हाधिकारी काळमपाटील यांनी गांर्भियाने दखल घेत संबधित विभागाला तातडीने अडचणी दूर करून तलावाचे काम पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. 

जलबिरादरीची सांगलीचे अंकुश नारायणगावकर व नव्या उमेदीचा लोकनियुक्त संरपच दिपक लंगोटे यांनीही त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तलावाचे महत्व जाणून असलेले शेतकरी आता तलाव पुर्तर्तेसाठी प्रयत्नशील झाले आहेत. लोकहितासाठी झटणारे डफळापूरचे पोपटराव पुकळे,संतोष बंडगर,दिपक बंडगर यांनीही याकामी पुढाकार घेतला आहे. यासाठी जलदूत राजेंद्रसिह राणा यांच्या जलबिरादरीची साथ जिरग्याळ तलावासाठी मिळत आहे.

जिरग्याळ परिसरातील महत्वाचा हा तलाव पुर्ण होणे काळाची गरज आहे. तलाव परिसरातील शेतकऱ्यांनी आता आक्रमक संघर्षाचा पवित्रा घेतला आहे.

या कामासाठी उपोषणाचाही इशारा ग्रामस्थानी दिला होता. याप्रकरणी गुरूवारी प्रांताधिकारी यांच्या बरोबर जिरग्याळ गावातील लोकप्रिनिधी, जलबिरादरीचे कार्यकर्ते यांची बैठक झाली. तीत मार्चच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्याचे ठरले आहे. सर्व प्रक्रिया पुर्ण होण्याच्या स्थितीत आहे. लवकरच काम सुरू होईल अशी स्थिती आहे.एकंदरित जिरग्याळ तलावासाठी निर्णायक लढा आता अतिंम टप्प्यात असल्याचे चित्र आहे. त्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे.दरम्यान गुरूवारी प्रातांधिकारी याच्यांशी डफळापूर जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,जिरग्याळचे संरपच दिपक लंगोटे, दिपक बंडगर,आंनदा सिंदवडे आदी लोकप्रिनिधी व 

यांची बैठक झाली.तीत तलावातील बाधित क्षेत्रातील 56 नंबर मधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रशासन स्तरावर तयारी सुरू आहे. नविन नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकरी,लोकप्रिनिधी व प्रशासनातील अधिकाऱ्यांची पहिल्या आठवड्यात बैठक आयोजित केली आहे. त्यात मुख्य प्रश्न मार्गी लावण्याचे नियोजन प्रशासनाचे आहेत. 

Rate Card

दरम्यान जलबिरादरीचे महाराष्ट्राचे प्रमुख नरेंद्र चुग व जलदूत राणा यांचे चिरजिंव मौलिक राणा यांनी नुकतीच जिरग्याळ येथे ग्रामस्थाची भेट घेत त्यांना मार्गदर्शन केले आहे.पाण्याचे महत्व व तलावाचे काम किती महत्वाचे आहे.यांचीही माहिती यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिली. शेतकऱ्यांच्या अडचणी यावेळी समजून घेण्यात आल्या. जिरग्याळ  तलाव पुर्ण करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न करूया असेही यावेळी ठरले. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.