विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शुक्रवारी स्नेहसंमेलन

0
7

डफळापूर, वार्ताहर : येथील शामराव (काका)पाटील एज्युकेशन सोसायटीचे विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूल डफळापूर मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन 2017-18 विविध कला गुणदर्शन कार्यक्रम शुक्रवार ता.23 फेंब्रुवारीला सांयकाळी 5 ते 11 संध्याकाळी  गायकवाड प्लॉट येथे संपन्न होणार आहे. डफळापूर परिसरातील अल्पावधीत लोकप्रिय झालेले इंग्लिश मिडियम स्कूलचा शैक्षणिक दर्जाबरोबर सर्वच स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. लवकरच प्रशस्त इमारतीत स्कूलचा कामकाज सुरू होणार आहे. त्याच स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी होत आहे. स्कूलच्या विद्यार्थ्याच्या कलागुणांतून दर्जेदार कलाकृती सादर करण्यात येणार आहेत. गेल्या महिन्यापासून या स्नेहसंमेलनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. नर्सरी पासून पहिलीपर्यतच्या विद्यार्थी विविध गुणदर्शन सादर करतील तरी या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व पालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्कूलच्या वतीने करण्यात आले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here