सांगली येथील ” युवा संवाद” परिषदेस हाजारोच्या संख्येने उपस्थित रहावे : दादाशेठ पांढरे

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : सांगली येथे 22 फेंब्रुवारीला होणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या “युवा संवाद परिषदे”ला हाजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जतचे भाजपचे युवा नेते तथा गणेश उद्योगसमुहाचे संस्थापक दादाशेठ पांढरे यांनी केली.

भाजपचे स्टार प्रचारक,युवा मोर्चाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नियोजनातून या युवा संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील भरकटलेल्या युवकांना योग्य मार्गदर्शन,संवाद साधता यावा यासाठी या परिषदेचे आयोजन केले आहे.या परिषदेस खा.पुजन महाजन,युवा मोर्चाचे राज्याध्यक्ष आमदार योगेश टिळेकर हे प्रमुख मार्गदर्शक असतील.याशिवाय जिल्ह्यातील खासदार, आमदार,युवा मोर्चाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत राजकारण, समाजकारण,व्यापार,शिक्षण,जिएसटी,कर्जमाफी,स्कॉलरशीप,उद्योगव्यवसाय करण्यासाठी कर्जपुरवठा,याशिवाय युवकांच्या विविध प्रश्नावर खुली चर्चा होणार आहे. परिषदेत खुल़्या चर्चेमुळे नवयुवकांना संधी उपलब्धं करून देण्यात आली आहे.सांगली येथील स्टेशन चौकामध्ये गुरूवार ता.22 फेंब्रुवारीला या “युवा संवाद” परिषदेचे आयोजन केले आहे. जत तालुक्यातील युवकांनी यात हाजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शेवटी दादाशेठ पांढरे यांनी केले.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.