शिवजयंतीनिमित्त बोर्गीतील जळीतग्रस्त कांबळे कुटूंबीयांना मदत

0जत,प्रतिनिधी : येथील शिवाजी चौक शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने अनावश्यक खर्च टाळत बोर्गी खुर्द (ता.जत) येथील जळीतग्रस्त कुटूंबीयांना किराणा माल,धान्य व संसारउपयोगी सर्व साहित्याची मदत केली.या समाजविधायक उपक्रमांने ऩवा आदर्श शिवप्रेमीकडून निर्माण केला आहे.

Rate Card

बोर्गी खुर्द येथील हणमंत कांबळे यांच्या घरास आग लागून घर पुर्णत: जळाले आहे. त्यामुळे कांबळे कुटूंबीय बेघर झाले आहेत.अशा घटनात झळ पोहचलेल्या सामाजिक बांधिलकी जपत जत येथील शिवप्रेमी संघटनेच्या वतीने मदत करण्यात येते. सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उत्सव मंडळाच्या कार्यक्रर्त्यांनी कांबळे कुटूंबीयांना जत येथे आणत बालशिवाजी,जिजाऊ व मावळ्याची वेशभुषा केलेल्या बालकांच्या हस्ते ही मदत देण्यात आली. यावेळी कॉग्रेस नेते तथा जिल्हा बँक संचालक विक्रमसिंह सांवत, प्रकाश जमदाडे, गणेश गिड्डे, अतुल मोरे,अॅड.युवराज  निकम,संग्राम जाधव, स्वप्निल शिंदे,भुपेंद्र कांबळे उपस्थित होते.

समाजिक तळमळ असणारे, समाजासाठी सतत वेगवेगळ्या उपक्रमांतून बांधिलकी जपणारे तरूणांना एकत्र करत गणेश गिड्डे यांनी नियोजन केले.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.