कोन होणार 2019 चा “आमदार ” तालुक्यातील राजकीय गप्पांना उधाण;पक्षाच्या उमेदवारी महत्वपुर्ण

0

आमदार विलासराव जगताप

भाजप नेते डॉ.रविंद्र आरळी

कॉग्रेस नेते तथा जिल्हा बँक संचालक विक्रमसिंह सांवत

राष्ट्रवादीचे नेते माजी सभापती सुरेश शिंदे

अजिक्यतारां प्रतिष्ठानचे अॅड. प्रभाकर जाधव

भाजप नेते तथा जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील

भाजप नेते तथा माजी सभापती प्रकाश जमदाडे

माजी आमदार प्रकाश शेंडगे

लिंगायत समाजाचे बडे प्रस्त, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील

जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती तम्माणगौंडा रवी

जत,प्रतिनिधी:सध्या लोकसभा,विधानसभेच्या निवडणूकीचे वारे वाहत आहे.लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर ते डिंसेबर दरम्यान निवडणूका गृहीत धरल्या जात आहे. त्या दृष्टीने सर्व पक्ष,इच्छूंकाच्या तयारी सुरू आहेत.  या निवडणुकांची राजकीय चर्चा आता शिगेला पोहोचली आहे. गावागावांतील पारांवर, हॉटेल, चौकाचौकांत प्रत्येक पक्षांचे कार्यकर्ते आपल्या उमेदवारांबाबत जनतेतून असलेल्या मताची चाचपणी करताना दिसत आहेत. आपलाच उमेदवार चांगला तर विरोधी उमेदवार असा? यातून काहींमध्ये शाब्दिक चकमकही झडत आहेत.

प्रत्येकजण आपल्या पसंतीच्या उमेदवाराबाबत आपले राजकीय मत मांडून पक्षश्रेष्ठींना व आपल्या नेत्यांना याच उमेदवारास तिकीट द्यायला पाहिजे अशा चर्चाचा खल सुरू आहे.स्थानिक पातळीवर कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचे किती निष्ठेने काम करूनही तसेच त्या पक्षाचे अधिकृत तिकीट मिळाले नाही.अशा उलटसुलट चर्चेने राजकीय वातावरण आणखी तापू लागले आहे. सध्या  इच्छुकांनी आमदारकी लढविण्यासाठी विद्यमान आमदार विलासराव जगताप, त्याचे चिरजिंव प्रमोद किंवा नातू संग्राम यांची नावे पुढे येत आहेत. तर भाजपमधूनच डॉ.रविंद्र आरळी,माजी सभापती प्रकाश जमदाडे,अजिक्यतारांचे अॅड.प्रभाकर जाधव,सभापती तम्माणगौंडा रवी, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांचे नावे चर्चेत आहेत.कॉग्रेसमधून जिल्हा बँक संचालक विक्रमसिंह सांवत यांचेच नाव चर्चेत आहे.राष्ट्रवादीतून माजी आमदार प्रकाश शेंडगे,माजी सभापती सुरेश शिंदे तसेच जनसुराज्य पक्षाचे नेते लिंगायत समाजातील बडे प्रस्त असणारे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बसवराज पाटील यांची नावे पुढे येत आहेत. उमेदवारी कोणाला मिळेल याबाबत सर्वांमध्येच संभ्रम दिसत आहे.राजकीय घडामोडीवर उद्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात आमदार विलासराव जगताप,डॉ.रविंद्र आरळी व कॉग्रेस नेते विक्रमसिंह सांवत यांची नावे सर्वात पुढे आहेत.भविष्यातील राजकीय समिकरणे कशी उदयास येतात यावर 2019 चा आमदार निश्चित असेलं.

Rate Card
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.