उमदी बेकायदा गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा तिनशे लिटर गावठी दारूसह सव्वा चार लाखाचा मुद्देमाल जप्त

0
6

उमदी,वार्ताहर :उमदी ता.जत गावच्या हद्दीत बेकायदेशीर गावठी दारूची विक्री करणाऱ्या शकुंबर लल्लु नदाफ यास तीनशे लिटर दारूसह रंगेहाथ पकडत 15 हाजार रुपये किंमतीच्या दारूसह सव्वा चार लाख रूपांयाचा मुद्देमाल जप्त करत कारवाई केली.त्यात त्यांची बुलेरो जिपही जप्त करण्यात आली आहे. सा.पोलिस निरिक्षक भगवान शिंदे यांच्या पथकाने गुरूवारी सायकांळी साडेपाच वाजता ही कारवाई केली. उमदीतील गावठी दारूविरोधी ही पहिलीच मोठी कारवाई करण्यात आली आहे. सिमावर्ती भाग असल्याने आंतराज्यीय दारू विक्रीचा धंदे सुरू आहेत. त्या पाश्वभुमीवर उमदी पोलिसांनी मोहिम उघडली आहे.अधिक माहिती अशी, उमदी  हद्दीतील अमोगसिध्द मंदिराजवळ  संशियत आरोपी शकुंबर नदाफ हा आपल्या पांढऱ्या कलरच्या बुलेरो (क्र.45,ए-7278) मधून गावठी दारूची वाहतूक करत असल्याची खबर उमदी पोलिसांनी मिळाली होती. त्या आधारे छापा मारला असता गाडीत जुन्या टुबमध्ये भरलेली 300 लिटर 15 हाजार रूपयाची दारू व वाहन जप्त करण्यात आले.

उमदी बेकायदा गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा टाकत तिनशे लिटर गावठी दारूसह सव्वा चार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here