मनरेगाच्या नविन कामासाठी प्रस्ताव सादर करा : बिडिओ संजय चिल्लाळ
जत,प्रतिनिधी : जत पंचायत समितीच्या माध्यमातून मनरेगा योजनेतील गोठा, विहिरी,शोषखड्ड्यासाठी तातडीने ग्रामपंचायतीनी पात्र लाभार्थ्याचे नवीन प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन बिडिओ संजय चिल्लाळ यांनी केले.
चिल्लाळ म्हणाले, मनरेगा प्रकरणातील यापुर्वीचा वादग्रस्त विषयावर तपासणी सुरू आहे. स्वंतत्र समितीकडून त्याबाबत अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल. तपुर्वी व्यक्तिगत लाभार्थ्यी शेतकऱ्यांची कुशलची बिले देण्यासंदर्भात आम्ही पाहणी करून ती बिले गतीने देण्यासंदर्भात आमचे प्रयत्न सुरू आहेत.

पंरतू त्यापुर्वी गेली वर्षभरापासून बंद आसलेली मनरेगा योजनेतील इतर नवी कामे सुरू करण्यात आली आहेत. दोन दिवसात मी 90 शोषखड्डे व चार विहीरीच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली आहे. ती कामे लवकरच सुरू होतील.
जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट असलेल्या गावा मधील विहिरीचे प्रस्ताव सादर करावेत. येत्या काही दिवसात तालुक्यातील शंभर प्रस्तावास तातडीने मंजूरी देणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क करावा. नव्या कामाचे बिल मस्टर, कामे व्यवस्थित करणाऱ्या लाभार्थ्यास गतीने बिले देण्यात येतील, त्यामुळे त्याबाबत कोणतीही साशंकता ठेऊ नये, असे आवाहन बिडिओ चिंल्लाळ यांनी केले.पलूस येथे कार्यरत असलेले चिंल्लाळ यांना जत पंचायत समितीचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे.गेल्या दोन दिवसात त्यांनी गतीने कामे सुरू केली आहेत. मनरेगाच्या जुन्या कामातील डफळापूर येथील एका लाभार्थ्याच्या गोठ्याची पाहणी त्यांनी केली आहे.जत पंचायत समितीच्या सर्व विभागांना ग्रामपंचायती, नागरिकांची गतीने कामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत.यापुढे कोणतीही योग्य कामे थांबणार नाहीत. यासाठीची खबरदारी घेतली जाईल.असे त्यांनी सांगितले.