अवैध वाळू वाहतुक करणारा डंपर, 6 ब्रास वाळू जप्त

0
7

जत,प्रतिनिधी:

जत पोलीसांनी अवैध वाळू वाहतुक करणाऱ्यां विरूध्द जोरदार मोहिम उघडली आहे. बुधवारी रात्री वाळूची चोरटी वाहतुक करणारा एक डंपर जत पोलीसांनी पकडला. त्यामधील 6 ब्रास वाळूसह सुमारे 25 लाख रूपांयाचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी कांताप्पा कांबळे व शिवाप्पा माळी या दोघांना ताब्यात घेतले.

जत पोलीसांनी वाळू चोरी विरोधात जोरदार 

मोहिम उघडली आहे. त्यासाठी खास पथक तैनात करण्यात आले आहे. पोलीस निरिक्षक राजू ताशीलदार यांनी शिवाजी चौक येथे वाळूची चोरटी वाहतुक करताना डंपर क्रंमाक एमएच-10 सीआर 595 पकडला. त्यांमध्ये सहा ब्रास वाळूसाठा होता.याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here