उमेश सांवत भाजपचे स्विकृत्त नगरसेवक

0

जत,प्रतिनिधी : नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष तथा आमदार विलासराव जगताप यांचे कट्टर कार्यकर्ते उमेश सावंत यांची निवड करण्यात आली. यापूर्वीच त्यांच्या पत्नी सौ. दीप्ती सावंत या प्रभाग तीनमधून निवडून आल्या आहेत. त्यामुळे पालिकेच्या इतिहासात प्रथमच पती पत्नी नगरसेवक काम करणार आहेत.

पालिकेच्या निवडणुकीत थेट काँग्रेस बसपा युतीचे सात, भाजपाचे सात आणि राष्ट्टवादीचे सहा नगरसेवक निवडून आले. तर थेट नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या उमेदवारांने बाजी मारली. नगरसेवकांच्या संख्येनुसार भाजपाचे व काँगेसचा एक नगरसेक स्वीकृत होणार होता. काँग्रेसने यापूर्वीच निलेश बामणे यांची निवड केली आहे. भारतीय जनता पार्टीतून कोणाला संधी मिळणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. भाजपकडून गजानन उर्फ राजू यादव, प्रवीण वाघमोडे व उमेश सांवत इच्छुक होते. तिघांनीही अर्जही दाखल केले होते. आमदार जगताप कोणाला संधी देतील याची चर्चा रंगली होती. 

सोमवारी निवडीचा कार्यक्रम पार पडला. बारा वाजता गटनेत्या सौ श्रीदेवी सगरे यांनी उमेश सावंत याच्या नावाचे पत्र नगराध्यक्षना दिले. त्यानुसार नगराध्यक्षानी उमेश सावंत यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड जाहीर केली. 

निवडीनंतर उपनगराध्यक्ष अप्पासो पवार,  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

Rate Card

कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. 

यावेळी आरोग्य सभापती टिमु एडके, शिक्षण सभापती सायबा कोळी, नगरसेवक इकबाल गवंडी, विजय ताड, प्रकाश माने, नामदेव काळे, निलेश बामणे, प्रमोद हिरवे, नगरसेविका श्रीदेवी सगरे, दिप्ती सावंत, जयश्री शिंदे, जयश्री मोटे, यांची उपस्थिती होती.

नगरसेवकपदी निवडीनंतर उमेश सावंत दांपत्याची लक्षवेधी विजयी मुद्रा.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.