शासनाच्या जटील धोरणानुसार शैक्षणिक क्षेत्र अडचणीत मनोहर बन्ने : आम्ही एसआरव्हीयिमियन2018 माजी विद्यार्थी मेळाव्यात संपन्न

0

जत,प्रतिनिधी : शासनाचे शिक्षण विषय धोरण चुकीचे राबविण्याने शिक्षण क्षेत्र अडचणी़त आले आहे.मुले रुपी दगडाला आकार देत त्याला वैभवता प्राप्त करण्याचे काम शिक्षण संस्थातून होत आहे.दर्जेदार शिक्षणामुळे आज अनेकजण उच्चपदस्थ अधिकारी,डॉक्टर, व विविध क्षेत्रात कतृत्ववान बनले आहेत. त्यामुळे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्र टिकले पाहिजे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मराठा मंदिर शिक्षण संस्थेचे सचिव मनोहर बन्ने यांनी केले.

ते जत येथे संस्थेच्या श्री.रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्यु कॉलेजच्या विद्यार्थी हिंतचिंतक समितीच्या वतीने आयोजित एसआरव्हीयिमियन 2018 या विद्यार्थीं मेळाव्यात बोलत होते.

मेळाव्याचे हे दुसरे वर्ष होते. शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांना एकत्रित जमवत हा मेळावा घेण्यात येतो.यंदाही मोठा प्रतिसाद लाभला. मेळाव्यास सचिव बन्ने,सोलापुरचे अप्पर तहसिलदार आर.टी.शिंदे,प्रा.मल्लिकार्जून माने,

संतोष कुलकर्णी, हाजी जतकर,प्राचार्य आर.डी.शितोळे,एन.डी. शिंदे, 

कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांची प्रमुख उपस्थिती होती.

बन्ने पुढे म्हणाले, जतची शाळेचा नावलौकिक कायम आहे. दर्जेदार शिक्षणाला आमची प्राथमिकता आहे. यापुढेही कायम राहिल यासाठी संस्था सर्वोत्तरी प्रयत्न करेलं.पुर्वीच्या शिक्षकांनी खास्ता खालल्या म्हणून आज अाज चांगले दिवस उजलेत. आताही काही शिक्षक मोठ्या रकक्मेचा पगार घेऊनही बाहेर शिकवणी वर्ग चालवितात. हे योग्य नसल्याचे बन्ने यांनी सांगितले.

Rate Card

अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे म्हणाले, या शाळेतून चांगले संस्कार, दर्जेदार शिक्षण मिळाल्यामुळे आम्ही यशाच्या शिखरावर आहोत. शाळेत दर्जेदार विद्यार्थी तयार केले जातात. म्हणून एआरव्हीएम नाव कायम आहे. आम्ही प्रतिकुल परिस्थिती नसतानाही शिकलो. त्याचे फळ आम्हाला मिळाले आहे. शिक्षणाला प्राथमिकता दिलीतर अशक्य काहीच नसते. आजचा हा मेळावा आमच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा ठरेलं.असेही शिंदे म्हणाले

या मेळाव्यात शाळेविषयी कतृज्ञता व्यक्त करत आपले जुने,नवे अनुभव यावेळी अनेक उपस्थितांनी व्यक्त केले.शाळेला बॅचेस,फळे,बांधकामासाठी भरिव देणगी यावेळी माजी विद्यार्थ्यांनी दिली.जत माजी विद्यार्थी हितवर्धक समितीने मेळाव्याचे आयोजन केले होते.यावेळी अनेक दानशूर विद्यार्थींनी शाळेला मोठी मदत केली, त्यांचे सत्कार करण्यात आले. हास्यसम्राट प्रा.दीपक देशपाडें यांनी खास आपल्या विनोदी ठस्सात आपले अनुभव सांगुन उपस्थितीचा मने जिकंली.डॉ.मनोहर मोदी,डॉ.भारत हेसी,डॉ.अशोक मोगली,डॉ.शालिवहन पट्टनशेट्टी, डॉ.राजेश पंतगे,डॉ.पराग पवार,डॉ. विद्याधर किट्टद, डॉ. वाघ,प्रमोद पोतनीस,सुरेश माने-पाटील,मिंलिद चव्हाण, विक्रमसिंह सावंत,उमेश सांवत,इकबाल गंवडी,संजय कांबळे, भैय्या कुलकर्णी, नाना शिंदे,श्रींकात कोकरे,चंद्रसेन सांवत,विजय काळगी,प्रा.राजेंद्र माने,पत्रकार जयवंत आदाटे आदि मान्यवर उपस्थित होते.जत: येथील आम्ही एसआरव्हीयिमियन 2018 माजी विद्यार्थी मेळाव्यात बोलताना सचिव मनोहर बन्ने,सोलापुरचे अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे व मान्यवर

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.