जत तालुक्यातील वाळू तस्करीच्या वाहनावर एलसीबीचा छापा चार ट्रकवर कारवाई : 29 लाख 54 हाजाराची वाळू जप्त

0

जत,प्रतिनिधी : जत शहरात रविवार सुट्टीदिवशी सुरू असलेल्या वाळू तस्करी करणाऱ्या चार ट्रक पकडले.सोनलकर चौक,तिप्पेहळ्ळी, धावडवाडी स्टँड,रोडवर बेकायदा वाळू भरून चालेले ट्रकवर कारवाई करत  29 लाख 54 हाजाराची 23ब्रास वाळू जप्त केली. स्थानिक गुन्हे शाखा सांगलीच्या पोलिस निरिक्षर राजन माने यांच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री या वाहनावर छापा टाकला.चालकासह काहींना ताब्यात घेण्यात पथकाला यश आले आहे, तर काहीजण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

शनिवार,रविवार सलग सुट्टी असल्याने महसूल विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याचा फायदा घेत शनिवारी मध्यरात्री मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक केली जात होती. शनिवारी मात्र महसूल विभागाच्या पथकाकडे वॉच लावून बसलेल्या वाळू तस्करांना गुंगारा देत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाळू गाड्या पकडल्या. पहिल्यादाच हि कारवाई झाल्याने जत तालुक्यात वाळू तस्करांना धक्का बसला आहे.

जत शहरातील सोनलकर चौक नजिक एमएच -50 पुढचा नबंर नसलेला ट्रक पकडत सात ब्रास वाळू जप्त केली.त्यात जयकुमार लक्ष्मण बोराडे रा.दुधेभावी,सचिन महादेव यमगर(सोरडी) यांना ताब्यात घेतले.

Rate Card

तिप्पेहळ्ळी नजिक दोन ट्रक पकडत 11 ब्रास वाळू जप्त केली. यात एमएच -10,एडब्लू-9489 या ट्रकमधील 4 ब्रास,तर एक नंबर नसलेल्या ट्रकमधून 7 ब्रास अशी 11 ब्रास वाळू जप्त करत धनाजी कुडलिंक दोदले(रा.सोरडी), संतोष महादेव पाटील, बंडू पाटील (दोघे रा.शिरढोण),दादा हिप्परकर (रा.जत) यांना ताब्यात घेतले.

तिसरी कारवाई धावडवाडी स्टँड नजिक केली त्यात एमएच -10, बीआर- 3043 हि ट्रक पकडत चार ब्रास वाळू जप्त केली, याप्रकरणी शिवाजी गंगाराम मंडले रा.वाघोळी(कवटेमहांळ),पिंटू नाईक यांना ताब्यात घेतले आहे. जत तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पहिलीच कारवाई केली व त्यात चार ट्रकवर कारवाई झाल्याने वाळू तस्कर धास्तावले आहेत.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.