खा.संजय पाटील यांची लोकनेते सुनिलबापू चव्हाण यांच्या कुटूंबियाची भेट

डफळापूर : येथील लोकनेते स्व. सुनिलबापू चव्हाण यांच्या कुटूंबियाची खा. संजय पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. लोकनेते चव्हाण यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम नुकताच झाला आहे. त्यावेळी खा. पाटील यांना येता आले नव्हते. त्यामुळे रविवारी उमदी येथील कार्यक्रम आटपून पाटील यांनी चव्हाण यांच्या निवासस्थानी जात त्यांचे चिरजिंव पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,हर्षवर्धन चव्हाण यांना आधार दिला. यावेळी बाजार समितीचे सभापती अभिजित चव्हाण, जिल्हा बँक संचालक चंद्रकात हाक्के उपस्थित होते.