उमदीत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 51 जोडपी विवाह बंधनात भाजप नेते संजय तेली यांनी सोहळ्याचे आयोजन करत सामाजिक बांधिलकी जपली

उमदीत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 51 जोडपी विवाह बंधनात
भाजप नेते संजय तेली यांनी सोहळ्याचे आयोजन करत सामाजिक बांधिलकी जपली
उमदी,वार्ताहर:उमदी (ता.जत) येथील भाजपाचे युवा नेते संजयअण्णा तेली युवा मंच यांच्यावतीने रविवार दि.11 फेब्रुवारी रोजी भव्य असा सर्वधर्मीय सामुदायिक 51 जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला. सध्याच्या स्थितीत लग्न म्हणजे श्रीमंत लोकांचा वारेमाप खर्च करण्याचा, तसेच आपली श्रीमंती समाजात मिरवून घेण्याची हौस असते, पण समाजात अशीही काही कुटूंबे आहेत की, त्यांना रोजंदारीवर कामास गेल्याशिवाय दोनवेळचे उदरनिर्वाह करणेही कष्ठप्राय असते. अशा वंचित कुटूंबांतील मुलामुलींचे विवाह लावून आधार दिला आहे. कोणतीही फी त्यांच्याकडून न घेता कोणाताही खर्च लग्नासाठी संबंधित कुटूंबाकडून न घेता अगदी उदात्त भावनेने आपल्या भावाच्या लग्नात विनाखर्च संजयअण्णा तेली यांनी गरजू 51 जोडप्याचे विवाह करून दिले आहेत. लग्नामध्ये सर्व वधूसाठी चांगल्या प्रतीचे साडी व वरांस सफारी, बूट असा पेहराव होता.
या लग्न सोहळ्यास खासदार संजय पाटील, आमदार विलासराव जगताप,सभापती तमन्नागौडा रवी पाटील, माजी जि प अध्यक्षा रेशमक्का होर्तिकर,प्रभाकर जाधव, संतोष अरकेरी,सोमनिंग बोरामनी,समाधान अवताडे विजापुर सह परिसरातील साधू-संत या सर्व मान्यवारांच्या उपस्थितीत लग्न सोहळा संपन्न झाला.वधु वराना शुभआशिर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
उमदीत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 51 जोडपी विवाह बंधनात बांधण्यात आली. या सोहळ्यास खा. संजय पाटील, आ.विलासराव जगताप,सभापती तम्माणगौंडा रवी,संजय तेली उपस्थित होते.
