विजपुरवठा तोडल्याने डफळापूर अंधारात सत्ताधारी-विरोधी गटाचे सोशल मिडियावर मोबाईलवॉर

0
Rate Card

डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ता.जत येथील ग्रामपंचायतीने विजबिल न भरल्याने ग्रामपंचायतीचे विजपुरवठा महावितरणने तोडला आहे. त्यामुळे गुरूवार ऐन बाजार दिवशी डफळापूर अंधारात होते. यांचे छायाचित्रे व सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनाचे खिल्ली उडविणारे फोटो सोशल मिडियावर रात्रभर व्हायरल होत होते.

जत तालुक्यातील मोठी व पुढारलेली ग्रामपंचायत म्हणून डफळापूरचा उल्लेख होतो. येथे मोठ मोठी आश्वासने देऊन डफळापूरचे हिवरे बाजार करतो म्हणून सत्ताधारी निवडून आले आहेत. मात्र हिवरे बाजार लांबचा विषय आहे. येथे बिलाअभावी विज तोडल्याने गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागतो आहे. प्रथम प्राथमिक समस्या सोडवा व नंतर हिवरे बाजारची स्वप्न दाखवा असा आरोप करणारा मॅसेज व वास्तवदर्शी अंधरातील छायाचित्रे विरोधी गटाकडून काही ग्रुपवर टाकण्यात आली.दरम्यान सत्ताधारी गटाकडून विरोधी गटाच्या सत्ताकाळात झालेल्या कामाबाबत आक्षेप नोंदवत तुम्हीही पारदर्शी नाही आहात असा मजकूर टाकताच,विरोधी गटाकडून सत्ताधारी गटाच्या एका नेत्याच्या कट्रक्शन कंपनीने केलेल्या कामाचा दाखला देत तुम्ही निकृष्ठ कामाचा डोंगर केला आहे,अशी कमेंट आली. त्यावर सत्ताधारी गटाकडून तुमच्या,आमच्या कामाची होऊद्या चौकशी असे मॅसेज फिरू लागले. पुन्हा विरोधी गटाकडून सत्ताधारी गटाच्या नेत्याने केलेल्या कामाचे नावसहित पुरावेच सादर करू,तुम्ही तयार रहा असे प्रतिआवाहन वॉट्सअॅपच्या माध्यमातून देण्यात आले आहे. प्रत्यक्षात खंडित विज विजय बाजूला पडला आहे. दोन्ही गटाकडून राजकीय हेवेदावे करण्यात येत आहेत.

सत्ताधारी गटाकडून विकास करण्यात कमी पडत असल्याने विषय फिरवत आहेत. प्रत्यक्षात आम्ही वास्तवता मांडली. गेल्या तिन महिऩ्यापासून ग्रामपंचायतीचे विजबिल थकल्याने महावितरणने ग्रामपंचायतीने विजपुरवठा तोडला आहे.त्यामुळे गुरूवारी गाव अंधरात होते,हे वास्तव आम्ही वॉट्सअॅपच्या माध्यमातून मांडले. मात्र सत्ताधारी गटाच्या काही नेत्यांने स्वत:चे कर्म झाकत बिनबुडाचे आरोप केले. प्रत्यक्षात त्यांनी टाकलेले निकृष्ठ इमारतीचे काम त्यांच्या सत्तेला टेकू लावलेल्या एका सदस्याने केले आहे.आम्ही केलेली कामे दर्जेदार आहेत. त्यामुळे त्यांनी आत्मपरिक्षण करावे

अभिजित चव्हाण, सभापती बाजार समिती जत

आश्वासन प्रमाणे ग्रामपंचायती कडून कामकाम सुरू आहे. प्रत्यक्षात विकासकामातून हिरवे बाजार धर्तीवर गावाचा विकास करणारचं आहोत.त्याला कितीही विरोध होऊ दे,आमचं काम सुरू राहिल. नेमके आम्ही सुरू केलेली कामे विरोधाकांना भविष्यातील राजकारणात अडचणीचे ठरत आहेत. आम्ही विकास केला तर आमचं पुढ कस होणार म्हणून पोटसुळ होत आहे. आम्ही विकासाची स्वप्ने दाखविणार नाही,तर तो सत्यात उतरवणार आहोत. त्यासाठीच्या उपाययोजना सुरू आहेत. विज पुरवठा खंडितचा विषय.. जिल्ह्यातून यापुर्वी बिले भरली जात होती. ग्रामपंचायतीकडे विजबिले भरण्याचे नियोजन नव्हते. त्यामुळे बिले थकली आहेत. आज त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून मार्ग काढू.

बंडू चव्हाण सर

सत्ताधारी गटाचे नेते

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.