संख अप्पर परिसराच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेलं पारदर्शी व सक्षम प्रशासनाची गरज ; नागरिकांचा बोलक्या प्रतिक्रियेतून वास्तवता उमटली

0

संख,वार्ताहर : जत तालुक्याचे विभाजनाची मागणी देश स्वतंत्र झाल्यापासून कायम होती. अलिकडे काही वर्षात जनरेटा वाढला होता. मात्र संख,उमदी,माडग्याळ वादात अनेक दिवस संख तालुका रखडला होता. आघाडी सरकार काळात जतकडे दुर्लक्ष झाल्याचे आरोप झाले. मात्र तिन गावच्या संघर्षामुळे विभाजन अडल्याचे काही अधिकारी सांगतात. मात्र या सर्व शक्यातावर आता पडदा पडला आहे. माडग्याळसह उमदीकरांच्या विरोध डावलून संख अप्पर तहसिल कार्यालयाचे उद्धाटन 26 जानेवारीला करण्यात आले. पांटबंधारे विभागाच्या जुन्या इमारतीत हे कार्यालय सुरू झाले आहे.महसूली अनेक विभागाचे काम सुरू झाले आहेत. अन्य काही विभागही पुर्ण क्षमतेने सुरू करावेत. एकंदरीत संख अप्पर तहसिल कार्यालयामुळे परिसरातील गावाचा विकास साधण्यास मदत होईल. शासनाला सध्या तालुका विभाजन शक्य नसल्याने अप्पर तहसिल कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्यक्षात सामान्य जनतेची कामे येथून होणार आहेत. भविष्यातील तालुका म्हणून संखकडे बघितले जाते अाहे. जत पुर्व भागाचा विकास करायची असेलतर संखला तालुका करण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. पंधरवड्यात संख अप्पर तहसिल कार्यालयाचां चांगला कारभार सुरू असल्याचे समोर येत आहेत. संख अप्पर तहसिल कार्यालयाच्या पाश्वभुमीवर आम्ही परिसरातील काही नागरिकांना बोलत केलं. त्यावर आलेल्या प्रतिक्रियातून संख तालुका निर्मिती व सक्षम प्रशासन परिसराचा बद्दल घडवू शकेल. असचं मते पुढे आली.

राज्य शासनाने आमच्या मागणीचा विचार करून योग्य ठिकाणी अप्पर तहसिल कार्यालय केले आहे.यामुळे संखच्या विकासाला चालना मिळेल, संखच्या विकासाच्या विकास पर्वाला सुरूवात झाली आहे. नागरिकांनी दाखविलेला विकास सार्थ ठरविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचाच भाग म्हणून उमदी,माडग्याळचा विरोध असताना आमदार विलासराव जगताप यांच़्या प्रयत्नातून संखला अप्पर तहसिल कार्यालय आणण्यात यशस्वी झालो आहोत. आता तालुका निर्मितीसाठी आमचा संघर्ष सुरू राहिल. संखच्या आदर्श बनविणाऱ्या सक्षम योजना राबवू
आर.के. पाटील,
 माजी सभापती तथा जेष्ठ नेते,संख





शासनाने संख या मध्यवर्ती गावात अप्पर तहसिल कार्यालय सुरू केल्याने समाधान वाटते.पांडोझरी व परिसरातील वाड्या-वस्त्यावरील नागरिकांना महसूली कामासाठी चाळीस किलोमीटरवरील जत येथे जावे लागत होते. आता वेळ आणि खर्च वाचणार आहे.संख अप्पर तहसिल कार्यालयामुळे परिसरातील गावांचाही विकास होणार आहे.शाळकरी मुलांच्या कागदपत्राचीही चांगली सोय झाली आहे. तातडीने दाखले संख येथून मिळणार आहेत. यापुढची कार्यालयेही शासनाने चालू करून संखलाच तालुका करावा.
सलिमा मुल्ला,
आदर्श संरपच पाडोंझरी


संखला अप्पर तहसिल कार्यालया सुरू करून शासनाने जत पुर्व भागातील गावांना स्वांतञ्यानंतर प्रथमच योग्य न्याय दिला आहे. कायम राज्यातील नेत्यांची वक्रदृष्टी राहिल्याने आम्हीही विकासापासून कोसोदूर राहिलो आहे.कोणतेही शासकीय कामासाठी पन्नास किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. तेथे लुटमार,चालढकल ठरलेलीच,मात्र संखला अप्पर तहसिल कार्यालया झाल्याने या त्रासातून सुटका होणार आहे.या कार्यालयातून नागरिकांच्या हिताचे पारदर्शी कामकाज व्हावे.
नामदेव पुजारी,
विद्यमान उपसंरपच,पांडोझरी



Rate Card

संख अप्पर तहसिल कार्यालयामुळे शालेय विद्यार्थ्यांचे कागदपत्रे वेळेत मिळणार आहेत. तसेच मुलांचे जत जाण्यायेण्याचा वेळ किंबहुना शैक्षणिक नुकसान टळले आहे. येथून विद्यार्थींना पाससाठी अडवणूक होऊ नये. तिंकोडी सह परिसरातील वाड्या-वस्त्यावरील नागरिकांचे महसूल प्रश्न मिटण्यास गती येणार आहे. जतच्या विकासासाठी संखला तालुका करून जतचे विभाजन करावे.

संतोष गोब्बी,उपप्राचार्य
चंद्रशेखर गोब्बी हायस्कूल अॅड. ज्यू कॉलेज



 


 संख अप्पर तहसिल कार्यालयामुळे जत तालुक्यातील कर्नाटक लगतचा सिमावर्ती भागातील शेतकऱ्यासह सामान्य नागरिक विकासाच्या प्रवाहत आले आहेत.पुर्व भागातील विकासाला खऱ्या अर्थाने आता सुरूवात झाली आहे. प्रशासनाने जनहिताला प्राधान्य देत कामकाम करावे.कोंतेबोबलाद, जाडबोबलाद,उमदी,सोनलगीसह लांब पल्ल्याच्या नागरिकांची खर्च व वेळेची बचत होणार आहे.आता तालुका निर्मितीसाठी आमचा संघर्ष कायम राहणार आहेत.
प्रा.जी.आर.पाटील
संचालक, गुरूबसव विद्यामंदिर संख



जत तालुक्यातील पुर्व भागातील शेतकऱ्यांच्या सह सामान्य नागरिकांच्या महसूली सह शासकीय कामासाठी जतला जात विघ्न पार करून कागदपत्रे किंबहुना कामे करावी लागत होती. त्यात मोठ्या प्रमाणात त्रास होयचा. अप्पर तहसिल कार्यालयाकडे येणाऱ्या सर्व रस्त्याचे मजबुतीकरण करावे.बाकीचे सर्व कार्यालये,पोलिस स्टेशन, निर्माण करावे. संखच्या गावातील विकासही व्हावा. मुळात तालुक्यासारखे गाव वाटले पाहिजे.
.अमसिध्द बिराजदार,
 उपसंरपच भिवर्गी



संखला महत्व प्राप्त झाले आहे. उमदी, माडग्याळ करांनी रोष संपवून संख अप्पर तहसिल कार्यालयाचे स्वागत करावे. सरकारने धोरण जनहितासाठी आहे. परिसरातील गावांचे प्रश्न सोडविण्यासाठी आता काहीप्रमाणात यश येईल. तालुक्याचे आंतर कमी झाले आहे. कार्यालयातून पुर्ण क्षमतेने काम सुरू करावेत. सर्व कार्यालये सुरू व्हावीत. एकंदरीत संख अप्पर तहसिल कार्यालयामुळे शासनाच्या कल्याणकारणी योजनेचा लाभ सामान्य नागरिकांना मिळण्यात मदत होणार आहे.
रियाज जमादार,पत्रकार

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.