अंकलेच्या संरपचपदी छाया दुधाळ तर उपसंरपचपदी सावध दुधाळ यांची निवड
डफळापूर : अंकले ता.जत ग्रामपंचायतीच्या संरपचपदी सौ.छाया दादासो दुधाळ यांची तर उपसंरपचपदी सावध महादेव दुधाळ यांची बिनविरोध निवड झाली. जत पश्चिम भागातील महत्वाचे गाव म्हणून अंकलेची ओळखं आहे. या गावचे तीन जिल्हा परिषद सदस्य निवडून आले आहेत. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील हेही अंकलेचे आहेत. त्यांच्यासह कुडलिंक सरगर,शंकरराव वगरे यांच्या नेतृत्वाखालील गटाची अंकले ग्रामपंचायतीवर सत्ता आहे.

