बोर्गी खुर्द ता.जत येथील दलित शेतकरी हणमंत कुशाबा कांबळे यांना संसारउपयोगी साहित्य व धान्याची मदत

बोर्गी,वार्ताहर : बोर्गी खुर्द ता.जत येथील दलित शेतकरी हणमंत कुशाबा कांबळे यांचे घर पेटवून दिल्याने कांबळे कुटुंबिय उघड्यावर आले आहे. त्यांना ग्रामपंचातीच्या वतीने संसारउपयोगी साहित्य, व धान्याची मदत देण्यात आली.यावेळी उपसंरपच राघवेंद्र व्होनमोरे,ग्रा.सदस्य अशोक बरडोले,ग्रामसेवक श्री. खोत व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामसेवक खोत यांनी कांबळे कुटुंबियाना रमाई घरकुल योजनेतून घरकुलासाठी प्रस्ताव पाठवून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
बोर्गी खुर्द ता.जत येथील दलित शेतकरी हणमंत कुशाबा कांबळे यांना संसारउपयोगी साहित्य व धान्याची मदत देण्यात आली.
