उपोषणांचा इशारा देताच दोन महिने रखडलेली जमिनीची नोंद एका झडक्यात ; खंडनाळ मधील प्रकार

उपोषणांचा इशारा देताच दोन महिने रखडलेली जमिनीची नोंद एका झडक्यात
खंडनाळ मधील प्रकार
संख, वार्ताहर : खंडनाळ ता.जत येथील गरीब शेतकरी भाग्यवंत तुकाराम कुळाल यांच्या जमिनीची नोंद घालण्यासाठी गावकामगार तलाठी यांच्याकडे सर्व कागदपत्रे दिली.अनेक वेळा चकरा मारत झाली का? नोंद!म्हणून पाठपुरावा केला, मात्र तब्बल दोन महिने वेळ नाही, म्हणणाऱ्या तलाठ्यांने कुलाळ यांनी उपोषणाचा इशारा देताच अगदी शासकीय सुट्टी असतानाही नोंद घातली. सातबारा ऑनलाईन केला. संख अप्पर तहसिल कार्यालयासमोर सोमवार ता.5 ला उपोषणास बसलेले पहिले अंदोलक शेतकरी भाग्यवंत कुळाल यांना सातबारा देऊन उपोषण मागे घेण्यास भाग पाडले.याबाबत उपोषण कर्त्या शेतकऱ्यांना पांठिबा देत काही सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी संबधित अधिकाऱ्यांनीही जाब विचारला त्यांनीही आपल़्याच कर्मचाऱ्यांना पाठिशी घालत तात्रिंक अडचण समोर करत वेळ मारून नेहली.
दोन महिऩ्यापासून मी नोंदीसाठी तलाठ्याकडे फेऱ्या मारत होतो,मात्र चिरीमिरीचे सवय लागलेले अधिकारी काहीतरी पदरात पडावे म्हणून अडणूक करून नोंद रखडविल्याचा आरोप कुलाळ यांनी केला. प्रत्यक्षात कुलाळ यांची कागदपत्रे व्यवस्थित होती. त्यामुळे नोंदीसाठी त्यांनी काहीही देण्यास असमर्थता दर्शविली. म्हणून गेल्या दोन महिऩ्यापासून कुळाल यांचा नोंद व साताबारा रखडविला.सतत मागणी करूनही तलाठी दादा घेत नाहीत म्हणून वैतागलेल्या कुलाळ यांनी थेट उपोषणांचा इशारा दिला. एकंदरीत परिसरातील सामान्य शेतकरी काही घ्या पण साहेब लवकर काम करा म्हणारे शेतकरी तलाठी महाशयांनी पाहिले होते. मात्र कुलाळ यांनी कोणताही विचार न करता सरळ उपोषणाचा इशारा दिला.तेव्हा पासून संबधित गावकामगार तलाठ्याची धावपळ सुरू होती. अखेर रविवारी शासकीय सुट्टी असतानाही नोंद करून सातबारा उतारा तयार करण्यात आला.सोमवारी निवेदनाप्रमाणे कुलाळ उपोषणास बसले दरम्यान संख अप्पर तहसिल कार्यालयाचे नवे तहसिलदार नागेश गायकवाड यांना या नवा प्रकार लक्षात आला त्यांनी तातडीने उपोषण कर्त्याचे म्हणणे ऐकून घेत संबधित गावकामगार तलाठ्याला बोलविले. तलाठी मोहोदयांनी सातबारा तयार असल्याचे सांगितले. तात्काळ गायकवाड यांनी कुलाळ व त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले सामाजिक कार्यकर्ते यांच्या सोबत सातबारा देऊन कुलाळ यांचा प्रश्न निकाली काढला.
मात्र जत तालुक्यातील अशा अनेक प्रकरणात अशा चिरीमिरीसाठी अडवूक करण्यात अनेक तलाठी महाशयां माहिर आहेत. शासनाचे आदेश डावलून तांत्रिक चुका दाखवत वरकमाई साठी अनेक नोंदी रखडविल्या आहेत. त्यात कोतवाल पासून मंडल अधिकाऱ्यांपर्यत गुंतागुंत असते.आज कुलाळ यांचा उपोषणांने मार्ग सुटला पंरतू कुलाळ सारखे अनेक शेतकऱ्यांचे काय? त्यांनीही कुलाळ यांचा मार्ग पत्करायचा का?असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीचा सातबारा मिळवण्यासाठी आंदोलन करावे लागते हे कुणाचे दुर्देव्य म्हणायचे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना चिरीमिरीची सवय, मग ती नाही मिळाली की,अशी अडवणूक करायची मग त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांना बंडाच निशान काढायचं का प्रत्येक वेळी?यावर जिल्हाधिकारी विजय काळमपाटील यांनी लक्ष घालावे तरचं भाग्यवंत सारख्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल.
संख: खंडनाळ मधील शेतकरी भाग्यवंत कुळाल यांच्या उपोषणांस पाठिंबा देणारे सामाजिक कार्यकर्ते