माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांचे क्रिकेटच्या मैदानात “जोरदार फटकेबाजी”करून जणू विधानसभा निवडणूकीचे “आक्रमक इरादे”च स्पष्ट

0

माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी येडेमच्छिन्द्र येथील क्रांतिसिह नाना पाटील स्मारकाच्या ग्राउंडवर क्रिकेट खेळताना “जोरदार फटकेबाजी”करून जणू विधानसभा निवडणूकीचे “आक्रमक इरादे”च स्पष्ट केले..।

Rate Card

      येथील मच्छिन्द्रनाथ प्रतिष्ठानने राज्यस्तरीय नाईट हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते..निमित्त होते,वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यस्मरणाचे! आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते रात्री 9 च्या दरम्यान स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले..यावेळी या परिसरातील नूतन लोकनियुक्त सरपंच,उपसरपंच,तसेच स्व.बापूंच्याबरोबर काम केलेल्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मानही करण्यात आला. या स्पर्धेचा पहिला सामना कोल्हापूर विरुद्ध नृसिहपूर असा झाला..या सामन्याचा आ.पाटील यांनी आनंद लुटलाच..त्याच वेळी त्यांनी हातात बॅट घेवून क्रिकेट खेळण्याचा आनंद ही घेतला… यावेळी त्यांनी उभी-आडवी फटकेबाजी केली,करून क्षेत्र रक्षकांची मोठी दमछाक केली..

        विनायक पाटील,देवराज पाटील,विजयबापू पाटील, संग्राम पाटील,बाळासाहेब पाटील,संजय पाटील,संभाजी कचरे यांच्यासह येडेमच्छिन्द्र व परिसरातील 10 गावातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. सभापती सचिन हुलवान यांनी स्पर्धेचे संयोजन केले.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.