जतच्या विकासासाठी विक्रम सांवत यांना साथ द्या आ.मोहनराव कदम : जत तालुक्यातील इंच न इंच जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी कॉग्रेस कठिबध्द
जत,प्रतिनिधी : कॉग्रेस नेते विक्रमसिंह सांवत यांना जत तालुक्यातील जनतेनी साथ द्यावी,कॉग्रेस सांवत किंबहुना जत तालुक्याच्या पाठिंशी ठामपणे आहे.जतचा परिपुर्ण विकास साधण्यासाठी विक्रम सांवत सारखा उमद्या
आमदार विधानसभेत पाठवा असे प्रतिपादन आमदार मोहनराव कदम यांनी केले.
ते कॉग्रेस नेते,जिल्हा बँक संचालक विक्रमसिंह सांवत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पाणी परिषेद व जिल्हा स्तरीय डांळिब चर्चासत्रात बोलत होते.वाढदिवसानिमत सांवत यांच्या शुभेच्छाचां वर्षाव करण्यात आला. जत तालुक्यातील कॉग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सकाळी सात पासून रात्री उशिरापर्यत सांवत यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यासमोर यात्रेचे स्वरूप आले होते.जत तालुक्याचे लाडके नेते,आपला माणूस म्हणून परिचित असलेले दादांना सामान्य जनतेपासून वरिष्ठ नेते,अधिकाऱ्यांनी अभिष्ठचिंतन केले.
यावेळी पाणी परिषदेस युवक प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, कर्नाटक राज्याचे कॉग्रेसचे राज्य कार्यकारणी सदस्य राजू पाटील, बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील,सांगली शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर,तानाजी पाटील, जत बाजार आवारचे सभापती अभिजित चव्हाण, काग्रेसचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य,व सर्व संरपच,आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येंने नागरिक उपस्थित होते.

कदम पुढे म्हणाले,जतच्या सर्वागिंन विकासासाठी सतत राबणारा सांवत हा नेता आहे. पाणी योजना,मजबूत रस्ते व शेती क्षेत्र सुधारणे हे जतचे प्रश्न आ वासून कायम आहेत. ते सोडविण्यासाठी कॉग्रेस कठिबध्द आहे.कॉग्रेसचे आज बळंकट होणे गरजेचे आहे. जत तालुक्यातील जनता कायम कॉग्रेसच्या पाठिशी आहे. हे नुकत्याच झालेल्या नगरपालिका,व ग्रामपंचायत निवडणूकीत निश्चित झाले आहे.
विश्वजित कदम म्हणाले,राज्य व केंद्रातील शासन फक्त प्रसिध्दी शासन आहे. कर्जमाफी थोताट बनले आहे. शेतकऱ्यांना उद्ववस्त करण्याचे धोरण शासनाचे आहे. त्यामुळे यावेळी जनतेनी कॉग्रेसच्या पाठिशी रहावे. जत तालुक्याला विक्रम सांवत सारखा तरूण नेता मिळाला आहे. कायम जतच्या विकासाचा योजना आखून त्यासाठी पाठपुरावा करणे हा सांवत यांचा प्रयत्न असतो. त्याचाच भाग म्हणून जत दुय्यम बाजार आवाराचे बदलेले रुपड आहे. जत पुर्व भागातील 42 गावाच्या पाणी योजनेसाठी सांवत कायम प्रयत्नशील आहेत. ती योजना कोणत्याही परिस्थिती पुर्ण करणार आहोत.म्हैशाळ, व कर्नाटकातील पाणी योजना पुर्ण करून जत तालुक्यातील इंच न इंच जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी कॉग्रेस कायम संघर्ष करेलं असेही यावेळी डॉ. कदम यांनी सांगितले.
विक्रमसिंह सांवत म्हणाले, माझ्या वाढदिवस औचित्य आहे. जत तालुक्यातील शेतकरी,कष्ठकरी,व सामान्य जनता जोपर्यत सुखी होत नाही, तोपर्यत मी जनतेच्या हितासाठी संघर्ष करेन,जत तालुक्यातील सिंचन योजना,पक्के रस्ते,व सर्वागिंन विकासासाठी मी काम सुरू आहे.सत्तेशिवाय विकास कामे करत आहोत.यापुढे करत राहिनं असे सांवत यांनी सांगितले.
