विक्रमसिंह सांवत यांच्या वाढदिवसानिमित्त डफळापूरात वृक्ष लागवड

0

डफळापूर,वार्ताहर ;येथे कॉग्रेस नेते तथा जिल्हा बँक संचालक विक्रमसिंह सांवत यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. दत्त पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी यांच्या पुढाकाराने गायकवाड प्लॉटमध्ये वृक्ष लागवड,डफळापूर जिल्हा परिषद शाळाच्या यशस्वी विद्यार्थ्याचे सत्कार, व वाढदिवस असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला.

विक्रमसिंह सांवत यांचे समर्थक असलेले ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब माळी यांनी वृक्ष लागवड ते संगोपन करण्याचे नियोजन केले आहे. गायकवाड प्लॉटमधील रस्ते,क्रिंडागण परिसरात वृक्ष लागवड करून त्यांला लोंखडी तारेचे कुंपन करत,ठिबकद्वारे पाणी सोडण्याची व्यवस्था केली आहे. पर्यावरण रक्षणार्थ दत्त पतसंस्थेच्या माध्यमातून हे आदर्शवत पाऊल माळी यांनी उचलले आहे.सांवत यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी डफळापूर मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल त्यांचा वह्या देत सत्कार करण्यात आला. तसेच विक्रमसिंह सांवत यांच्या वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी बाजार समिती सभापती अभिजित चव्हाण, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,अशोक सवदे, जयाची शिंदे,अजित भोसले,गणेश गिड्डे, प्रविण पाथरूट,गणेश वठारे, महेश चव्हाण, अजित खतीब,अशोक भोसले,संदानद वाघमारे सर,मोहन भोसले,विजय चव्हाण,नागणे साहेब,गोटू शिंदे,विजय संकपाळ, राजेंद्र पवार व दत्त पतसंस्थेचे सर्व कर्मचारी, पिग्मी एंजट उपस्थित होते.

Rate Card

कॉग्रेस नेते तथा जिल्हा बँक संचालक विक्रमसिंह सांवत यांच्या वाढदिवसानिमित्त डफळापूर येथे वृक्ष लागवड, व यशस्वी विद्यार्थ्याचे सत्कार करण्यात आले..

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.