शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्यास सडेतोड उत्तर देऊ: सुरेश शिंदे
जत,प्रतिनिधी:शासनाने दडपशाहीने शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्यास राष्ट्रवादी काँग्रेस सडेतोड उत्तर देईल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे यांनी दिला. तालुक्यातील मुंचंडी येथील शेतकऱ्यांच्या उपोषणाप्रसंगी ते बोलतहोते. यावेळी शिंदे म्हणाले, मंजूर तलावाचे काम न करता वेगळ्याच ठिकाणी सर्व्हेक्षण करणे चुकीचे आहे. कोणताही आदेश व मंजूरी नसताना सुरू असलेले सर्व्हेक्षण तातडीने थांबविणत यावे, ओढापात्रावर को.प. बंधारे बांधण्यात यावेत. शेतकऱ्यांच्या इच्छेच्या विरोधात जर शेतकऱ्यांच्या जमिनी बळकाविणचा प्रयत्न झाला तर तला आमचा विरोध राहिल, असा इशारा शिंदे यांनी दिला.

