मुंचडीतील शेतकऱ्यांचे तलावाचे काम तातडीने करावे या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू
जत,प्रतिनिधी: मुचंडी यथे मंजूर झालेला 13 कोटी खर्चाचा साठवण तलावाचे काम तातडीने सुरू करावे. ठेकेदार व अधिकारंनी दडपशाहीने सुरू केलेला नवीन सर्व्हे तातडीने थांबवावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवार पासून जत तहसील कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.मुचंडी येथील शेतकरी विजय काटे, महादेव बिज्जरगी, शेखर सौंदत्ती, तम्माण्णा शिंदे, बाबू मंगसूळी, दुंडाप्पा अरगी व लक्ष्मण सौंदत्ती हे शेतकरी उपोषणास बसले असून गावातील अनेक शेतकरी, ग्रामस्थ व महिलांनी पाठींबा दिला आहे. पहिल्या दिवशी लघुसिंचन जलसंधारण उपविभागाच अधिकाऱ्यांनी भेट देऊन शेतकऱ्यांचे म्हणने ऐकूण घेतले.यावेळी शेतकरी व अधिकारी याच्यांत शाब्दीक वाद झाले. नवीन सर्व्हेक्षण थांबविण्याचे लेखी आश्वासन दिल्या शिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.उपोषणास बसलेले शेतकरी विजय काटे व महादेव बिज्जरगी म्हणाले, लघुसिंचन विभागाचे अधिकारी व ठेकेदाराचे लोक शेतकऱ्यांकडून नवीन ठिकाणी तलाव करण़्यासाठी जबरदस्तीने शेतकऱ्यांचे संमतीपत्रावर आंगठे घेत आहेत. तुम्हाला नवीन डांबरी रस्ता कराचा आहे, घरे मंजूर होणार आहेत,अशी खोटी आमिषे दाखवून सह्या घेत आहे. त्यामुळे संबंधितांची चौकशी होऊन कारवाई करावी.अंदोलकांनी तहसिलदाना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, मुचंडी ओढ्यावर जलसंधारण विभागाने 13 कोटींचा साठवण तलाव बांधणस मंजूरी दिली आहे. ठेकेदारास 10 जूलै2014 पासून कार्यरंभ करण्याचा आदेश दिला आहे. तलावाचे काम पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांची मुदत देण्यात आली आहे. तलाव पूर्ण करण्याची मुंदत जूलै2017 मध्ये संपली आहे.मुदत संपूनही सहा महिने उलटले तरी पण तलावाचे उद्घाटनही होऊ शकले नाही.जून मध्ये तलावाचे काम न करताच बेकादेशीरपणे नवीन तलावासाठी सर्व्हेक्षण सुरू केले आहे.काम न करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे, ठेकेदारास पाठीशी घालणार अधिकाऱ्यावर कारवाई करावी. नवीन तलावाचे दडपशाहीने सुरू केलेले सर्व्हेक्षण तातडीने थांबवावे, अन्था याहूनही तीव्र आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

