सांगलीत शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
सांगली : बेळुंखी(ता. जत) येथील गोरख बजाबा केंगार या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेतले. ते काडी ओढून पेटवून घेणार एवढ्यात पोलिसांनी पकडल्याने पुढील अनर्थ टळला. जनावरांचा गोठा आणि पंतप्रधान आवास योजनेतून त्यांना घरकूल मंजूर झाले आहे, मात्र वेळोवेळी पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
