कधी होणार शहरातील नागरिकांची खड्ड्यातून मुक्ती सर्व च रस्त्यांची दुर्दशा : पालिका, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
जत,(प्रतिनिधी): शहरातील रस्ते दुरूस्थी पूर्णत: ठप्प असल्याने रस्त्यावरील खड्डे सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवघेणे ठरू लागले आहेत. रस्त्यांच्या दुर्दशेमुळे अपघात तर होतातच सोबतच पाठ, मान आणि कंबरेचे आजार
बळावल्याचे मत येथील तज्ञ्यांनी व्यक्त केले आहे.वैतागलेल्या जनतेनीं निवडून दिलेले नवे पदाधिकारी या खड्ड्याकडे कधी लक्ष देणार असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे.रस्तावरील खड्ड्यामुळे मणके,पाठदुखीचे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अनेक खासगी रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून कंबर आणि पाठीचा आजार जडलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत काही ठराविक दुचाकी वाहने आणि शहरातील खड्डामय रस्ते यांना या आजारासाठी कारणीभूत मानले आहे.खड्डामय रस्त्यांमुळे मागिल काही महिन्यात शहरातील विविध भागात पन्नासच्या जवळपास अपघात घडले आहेत.नगरपालिका प्रशासन व स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याने रस्त्यावरील खड्डे अधिकाधिक खोल होत चालले आहेत. शहरातील रस्त्यांची अवस्था आज अत्यंत दयनिय झाली असून हे खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी शहरातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून करीत आहेत. शहरातील कोणत्याही भागात दुचाकी घेऊन जायचे असेल तर रस्त्यावरील खड्डय़ांमुळे हाडे खिळखिळी झाल्याशिवाय राहणार नाहीत, अशी स्थिती आहे. जत शहरातील रस्त्याच्या दुरूस्थीकडे नव्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन दर्जेदार रस्ते निर्माण करावेत अशी मागणी वाढली आहे.

