संख अप्पर तहसिल कार्यालयाचे उद्धाटन सर्व अनिश्चितेवर अखेर पडदा ; आमदार विलासराव जगताप यांच़्या प्रयत्नाला यश

0

Rate Card

जत,का.प्रतिनिधी: संख अप्पर तहसिल कार्यालयाचे उद्धाटन अप्पर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार विलासराव जगताप, तहसिलदार अभिजित पाटील, माजी सभापती आर.के.पाटील,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, रेखा बागेळ्ळी, पंचायत समिती सदस्य मनोज जगताप,कविता खोत,संखच्या संरपच मंगल पाटील  प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, पहिले तहसिलदार नागेश गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.अप्पर कार्यालयासमोर 26जानेवारी प्रजासत्ताकदिनी पहिले ध्वजवंदनही यावेळी करण्यात आले.

जतच्या विकासाचा या कार्यालयामुळे मैलाचा दगड पार केलायं अस म्हणल्यास वावगे वाटणार नाही. भला मोठा विस्तार असलेल्या जतचे विभाजन करण्याची मागणी गेल्या तीन तपापासून सुरू होती. प्रंचड लांबच्या सिमा,गावागावाचे मोठे अंतर यामुळे सामान्य जनतेची विविध शासकीय कामे करताना कसरत करावी लागत होती. जतपासून तब्बल 60 ते 70 किलोमीटर अंतराची गावातील नागरिकांना कोणत्याही शासकीय कामे करायची म्हटले तरी दिव्य पार करावे लागत होते. जनतेचा रेटा व आमदार विलासराव जगताप यांच़्या पाठपुराव्यामुळे संख अप्पर तहसिल कार्यालयाला मंजूरी मिळाली होती. मंजूरीनंतरही माडग्याळ व उमदीच्या विरोधामुळे कार्यालया पुढील अडचणी वाढल्या होत्या. मात्र आमदार विलासराव जगताप यांनी व प्रशासकीय पातळीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संख अप्पर तहसिल महत्वपुर्ण असल्याचे पटवून देण्याची भुमिका घेतली होती. त्यामुळे अखेर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातून ता.25 जानेवारीला संख अप्पर तहसिल कार्यालयाचे उद्धाटन पत्रिका निघाल्याने कार्यालय उद्धाटनाचा मार्ग मोकळा झाला होता. आज शुक्रवार 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी अखेर उद्धाटन सोहळा संपन्न झाला. मोठ्या संख्येंने उपस्थित नागरिकांच्या उपस्थितीत अप्पर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांनी फित कापून कार्यालयाचे अधिकृत्त उद्घाटन केले. यावेळी प्रथमपासून प्रयत्न करणारे आमदार विलासराव जगताप, तहसिलदार अभिजित पाटील उपस्थित होते. या कार्यालयाचे पहिले तहसिलदार म्हणून अभिजित पाटील यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिला आहे.यावेळी राजेंद्र कन्नुरे,रमेश बिरादार,अॅड.बसवराज जिगजेणी,राजेद्र हलकुडे,सिध्दना राचगोंड,तसेच संखचे मंडल अधिकारी रोहीत पाटील,संखचे तलाठी श्री. उदगेरी,माजी सुभेदार बापु माने,साहेबराव टोणे,मलिकर्जुन बागेळी,रामगोंडा फुटाणे,नुतन अप्पर तहसिदार नागेश गायकवाड, उमदीचे पोलिस निरिक्षक श्री.शिंदे,श्री.संपागे व संख परिसरातील हाजारो नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.