जत बाजार समितीत भाजीपाला सौद्याचे गुरुवारी उद्घाटन
जत,प्रतिनिधी : राजे विजयसिंहराजे डफळे दुय्यम बाजार आवार जत येथे कॉग्रेस नेते तथा जिल्हा बँक संचालक विक्रमसिंह सांवत, सभापती दिनकर पाटील, उपसभापती तानाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ता.25 जानेवारीपासून भाजीपाला कट्टे(सौदे) सुरू होणार आहेत. त्याचे उद्धाटन गुरूवारी सकाळी 8 वाजता कॉग्रेस सांवत यांच्या हस्ते होणार आहे.
बाजार समितीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक प्रश्न मार्गी लावत जत बाजार आवार सर्व शेतमालाचे विक्री केंद्र करण्याचा प्रयत्न कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून गेल्या वर्षी डांळिब सौदा सुरू करण्यात आला होता. त्यामुळे तालुक्यासह आसपासच्या कवटेमहाकांळ, सांगोला मंगळवेडा, व सिमावर्ती भागातील शेतकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. या सौद्यात कोट्यावधीची उलाढाल होत आहे. शिवाय परिसरातील शेतकऱ्यांना जवळ मार्केट उभे करण्यात आले आहे. त्यापुढे पाऊल उचलत आता भाजीपाला सौदे चालू करण्यात येत आहेत. जत तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकवतात. अनेक विक्रेतेही अशा मालाची विक्री करतात. त्यांना मिरज,सांगली येथून माल खरेदी करावा लागत होता. या सौद्यामुळे आता जतेत माल मिळणार आहे. शेतकऱ्यांसह,व्यापाऱ्यांचा वाहतूक खर्च यामुळे वाचणार आहे.कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांच्या मार्गदर्शनाखाली जत बाजार आवार कात टाकत आहे. समितीच्या वतीन सातारारोड,जनावरां बाजाराजवळ व्यापारी संकुल उभारत आहे. जत आवारात शेतकरी निवासही नव्याने आकारास येत आहे. याशिवाय शेतकरी हिताचे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव,व जवळच मार्केट उभे करून देऊन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यापुढे बाजार आवारात नाविन्यपुर्ण उपक्रम राबविले जातिल. असे यावेळी सांवत यांनी सांगितले.

जत आवारात गुरूवार ता.25 ला सकाळी आठ वाजता भाजीपाला कट्ट्याचे उद्धाटन होणार आहे.त्यानंतर दररोज सकाळी 8 वाजता भाजीपाला सौदे होतिल. त्यादरम्यान शेतकऱ्यांनी आपला माल सौद्यासाठी आणावा,व्यापाऱ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन जत दुय्यम आवाराचे सहसचिव सोमनिंग चौधरी यांनी केले.
