जिरग्याळ तलावप्रकरणी तातडीने कारवाईचे आश्वासन

0

जत,प्रतिनिधी: जिरग्याळ ता.जत येथील पांटबंधारे विभागाच्या रखडलेल्या  तलावाचे काम पुर्ण करावे व भुसंपादन झालेल्या शेतकऱ्यांचा योग्य मोबदला मिळावा यासाठीची जिल्हाधिकारी विजय काळमपाटील,जलबिरादरीचे डॉ. राजेंद्रसिंह राणां यांचे सहकारी डॉ. रविंद्र व्होरा,नरेंद्र चुंग,अंकुश नाराथणकर व शेतकऱ्यांची महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली. 

रखडलेल्या तलावाचे काम गेल्या सतरा वर्षापासून रखडले आहे. भुसंपादन व शेतकऱ्यांच्या योग्य मोबदल्या साठी न्यायालयीन प्रक्रियेत हे काम रखडले आहे. तलावाचे काम पुर्ण झाल्यानंतर परिसराचे नंदनवन होणार आहे. त्यामुळे या तलावाचे काम पुर्ण करण्यासाठीचा रेटा वाढला आहे. त्या अनुषगांने शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्या पाश्वभुमीवर जलबिरादरीच्या वतीने या कामासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पाणी अडविणे महत्वाचे आहेत, त्यामुळे तलावाच्या कामाच्या अडचणी सोडवून काम पुर्ण करावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्यापुढे मांडण्यात आली. 

Rate Card

यावर जिल्हाधिकारी विजय काळमपाटील यांनी जलसंधारणाचे कार्यकारी अभिंयता श्री. पाटोळे,जतचे प्रांताधिकारी श्री. ठोंबरे यांना सक्षम बोलवत तलावाचे काम तातडीने पुर्ण करून विस्तापितांना योग्य मोबदला देण्याविषयी मार्गदर्शन केले.  पुढील पावसाळ्यात पर्यत तलावचे काम पुर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय कारवाई करू असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.

यावेळी पोपटराव पुकळे,संतोष बंडगर,दीपक लंगोटे, महादेव पाटील सर,रांजेद्र शेळके,सदाशिव शेळके आदि शेतकरी उपस्थित होते.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.