येत्या दोन वर्षात जत तालुक्याचा कायापालट करू आ.विलासराव जगताप ;यावर्षी विविध विकासकामासाठी 32 कोटीचा निधी उपलब्धं

0

Rate Card

जत,प्रतिनिधी:भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दुष्काळी तालुक्याकडे विशेष लक्ष दिले आहे. या वर्षी विविध योजनेतून 32 कोटी 20 लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच आपला अजेंठा आहे. दिलेला शब्द पाळणारा मी असून येत्या दोन वर्षात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करत आहेत.येत्या दोन वर्षात जत तालुक्यात विकास योजना रावबून कायापालट करू असे प्रतिपादन आ.विलासराव जगताप यांनी दैंनिक संकेत टाइम्सशी बोलताना केले.निसर्गाने अवकृपा केलेल्या या तालुक्यावर आघाडीने शासनाने अन्याय केला. जिल्हयातील मत्र्यांनी तालुक्याचा निधी पळविल्याने तालुका 50 वर्षे मागे राहिला. तालुक्यातील कॉँग्रेसची मंडळीनी कुरघोड्या केल्या. त्यामुळे आम्ही भाजपातून निवडणूक लढविली. जनतेनी मोठ्या विश्वासाने मला निवडून दिले आहे. त्यांना दिलेला शब्द पाळण्याची जबाबदारी स्विकारली आहे. भाजपा सरकारनेही दुष्काळी तालुक्यावर विशेष लक्ष दिले आहे. म्हैसाळ योजनेचा  पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश केल्याने निधी प्राप्त झाला आहे. येत्या दोन वर्षात या योजनेचे काम पुर्ण क्षमतेेने सुरु होईल.महसुली भार कमी करण्यासाठी संख अप्पर तहसील कार्यालय येत्या 26 तारखेपासून सुरु होणार आहे. यामुळे पूर्व भागातील लोकांची सोय झाली आहे. या वर्षी तालुक्यासाठी 32 कोटी 20 लाख रुपयांचा निधी आला आहे. यातून अनेक गावातील रस्त्याचे प्रश्न मिटणार आहेत. सभा मंडप, अभ्यासिका, शाळा, पिकअप शेड या कामामुळे ग्रामीण भागातील विकासात भर पडणार आहे. अर्थसंकल्पीय रस्तेव्हसपेठ ते को. बोबलाद रस्ता (राज्य हद्द) दुरुस्ती (362.18 लाख), खैराव ते निगडी (300 लाख), वायफळ (सांगोला हद्द) ते जत (400 लाख), संख ते मुचंडी रस्ता दुरुस्ती (534.32 लाख), 

*विशेष दुरुस्ती रस्ते*

 व्हसपेठ ते तिकोंडी को. बोबलाद राज्यहद्दी पर्यंत (425 लाख), वाळेखिंडी ते जत रोड रेल्वे स्टेशन रस्त्याची दुरुस्ती (60 लाख), कोसारी ते कुंभारी रस्ता दुरुस्ती (160 लाख),  ढालगाव हद्द ते अंकले व डफळापूर ते जिरग्याळ (140 लाख), जत ते उमराणी (54 लाख)

*जिल्हा नियोजन रस्ते*

व्हसपेठ ते दावल मलिक दर्गा (20 लाख), माडग्याळ लकडेवाडी जाडरबोबलाद रस्ता (40 लाख), हळ्ळी गिरीष फार्म  उटगी (95 लाख), बालगाव ते जिगजेणी (20 लाख),  उमदी ते सोनलगी (25 लाख),  उटगी ते जाडरबोबलाद (50 लाख), आबाचीवाडी ते लकडेवाडी (20 लाख),  टोणेवाडी ते पडळकरवाडी (20 लाख), येळवी ते प्रजीमा 69 (25 लाख), निगडी (चांभार वस्ती ) ते वायफळ (20 लाख),   पांडोझरी ते पारधीवस्ती रस्ता खडीकरण(6 लाख), तिकोंडी ते कागनरी लमाणतांडा रस्ता दुरुस्ती (20 लाख),  तिकोंडी ते कागनरी लमाणतांडा मोरी बांधणे (10 लाख), जालीहाळ बु. ते करेवाडी रस्ता मजबुतीकरण (40 लाख), मोकाशेवाडी- आंवढी रस्ता मजबुतीकरण (35 लाख), वाळेखिंडी ते जाधववाडी रस्ता दुरुस्ती (20 लाख), डोर्ली (मानेवाडी ) ते हिवरे रस्ता दुरुस्ती (30 लाख), उमराणी ते सिंदूर (बेडरहट्टी) मजबुतीकरण (30 लाख), उंटवाडी ते मेंढेगिरी  रस्ता दुरुस्ती (35 लाख)

जत तालुक्यातील रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन, विशेष दुरुस्ती, अर्थसंकल्प या योजनेमधून एकूण 29 कोटी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

*आमदार स्थानिक विकास निधी सभामंडप / व्यायाम शाळा*

सोन्याळ (7 लाख),  उटगी (7 लाख),  येळवी (7 लाख),  निगडी खुर्द (7 लाख), आसंगी जत (7 लाख), गुलगुंजनाळ (7लाख), कोणबगी (7 लाख), धुळकरवाडी (7 लाख), खंडनाळ (7 लाख), हिवरे (6.85 लाख),  एकुंडी (7 लाख), सिंदूर (7 लाख),  उमराणी (7 लाख),  मल्लाळ (7 लाख), करेवाडी को. बो. येथील अंतर्गत रस्ते कॉक्रीटी करण करणे. (5 लाख), विजापूर रस्ता ते उमराणी रस्ता बंदिस्त गटार करणे, रुंदीकरणासह मुरमीकरण करणे (7.00)

*आमदार स्थानिक विकास निधी एस. टी. पिक अप शेड*

गुलगुंजनाळ (3 लाख), करेवाडी को. बो. (3 लाख), तिप्पेहळळी (2.75 लाख), बागलवाडी फाटा (2.77 लाख), बिळूर (लक्ष्मी फाटा) (0.99 लाख), बिळूर (सुतार फाटा) (.99 लाख), बिळूर (केसारळ तलाव) (0.99 लाख), बिळूर (लोहार फाटा) (0.99 लाख), उंटवाडी (3 लाख) इ. कामांसाठी 1 कोटी 40 लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ झाला आहे. 

उर्वरित आमदार फंडातून वाषण सभामंडप (6.80 लाख), बागेवाडी सभामंडप (6.80 लाख), तसेच जत तालुक्यामध्ये 24 स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी (25 लाख) व दलित वस्तीमध्ये समाज मंदिर बांधकामासाठी (अक्कळवाडी, गिरगाव, बिळूर) (21 लाख) इ. कामे लवकरच मंजूर होऊन कामे पूर्ण होतील.

*तीर्थ क्षेत्र विकास निधी*

कोळगिरी (भैरवनाथ मंदिर) (5 लाख), व्हसपेठ (दावल मलिक दर्गा) (10 लाख) , सोन्याळ (विठूराया मंदिर) (5 लाख),  काराजनगी (सिद्धेश्वर मंदिर) (5 लाख), गुड्डापूर (आर. सी. सी. रस्ता) (5 लाख), को. बोबलाद (कुंतीदेवी मंदिर)  (5 लाख), शेगाव (पीर दर्गा) (5 लाख) इ. कामांसाठी तीर्थ क्षेत्र विकास निधी अंतर्गत 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

*जिल्हा नियोजन शाळा इमारत बांधकाम*

माडग्याळ (5 लाख), हळळी (5 लाख), पाच्छापूर (5 लाख), उमराणी (5 लाख), एकूण 20 लाख रुपये मंजूर आहेत.

खासदार स्थानिक विकास निधी सभामंडप / व्यायाम शाळा / अभ्यासिका

सोरडी (सभामंडप) (7 लाख), लवंगा (अभ्यासिका) (6 लाख), कागनरी लमाणतांडा (अभ्यासिका) (7लाख) एकूण 20 लाख रुपये मंजूर आहेत.

जत तालुक्यातील विकास कामांसाठी सर्व योजने अंतर्गत 32 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे.

     यावेळी जि. प. आरोग्य व शिक्षण सभापती तम्माणगौडा रवि पाटील, उपसभापती शिवाजी शिंदे,  जि प सदस्य सरदार पाटील, जि प सदस्या सुनिता पवार, पंचायत समिती सदस्य मनोज दादा जगताप, पंचायत समिती सदस्य विष्णू चव्हाण, पंचायत समिती सदस्या श्रीदेवी जावीर मार्केट कमिटी माजी सभापती प्रकाश जमदाडे साहेब,  पंचायत समिती सदस्य रामण्णा जीवन्नावर, शिवाप्पा तांवशी, अप्पासाहेब नामद, बसू जबगोंड, अप्पसाहेब पाटील, राजू चौगुले, शहाजी, बोराडे, बसवराज पाटील, रवी पाटील, दगडू शिंदे, आर के पाटील सर, माजी जि. प. अध्यक्ष अण्णासाहेब गडदे, विष्णू चव्हाण,  आय. एम. बिराजदार, राजू हलकुडे, राजेंद्र कन्नुरे, श्रीकांत पाटील, विश्वास भोसले, अशोक पुजारी, धानाप्पा पुजारी, चंद्रशेखर पुजारी, इकबाल पठाण, रमेश जगताप, लक्ष्मण बोराडे, सीताराम गायकवाड, सलीम टपाल, यासीन मुल्ला, गिरमल रगटे, संजय यादव, सदा कोळेकर विठ्ठल निकम, मनोहर सुतार सायबाण्णा मुचंडी, भैरू चव्हाण, राम साळुंखे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो

जत तालुक्यात मंजूर झालेल्या विकास कामाचे आमदार विलासराव जगताप यांनी तीन दिवस तालुक्यात मॅरेथॉन दौरा करत सुमारे 75 कामाचे उद्धाटने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.