जिरग्याळ तलावासाठीचे उपोषण तहसिलदारांच्या आश्वासनानंतर मागे

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील जिरग्याळ येथील लघू पांटबंधारे विभागाच्या तलावाचे रखडलेल्या तलावाचे काम पुर्ण करून भुसंपादन केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी लाभ लाभधारक शेतकऱ्यांनी 23 जानेवारीला तहसिल कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावर संबधित विभाग व तहसिल कार्यालयाकडून याबाबतचा तातडीने उपाययोजना करून काम पुर्ण करण्यात येईल व योग्य मोबदला देण्यासाठी प्रयत्न करू असे तहसिलदार अभिजित पाटील यांनी आश्वासनाचे पत्र दिल्याने उपोषण मागे घेण्यात आल्याचे शेतकऱ्यांना जाहीर केले आहे.

या तलावाचे काम प्रत्यक्षात 16 जानेवारी 2010 सुरू झाले होते. ओढापात्रातील मुख्य बांधाचे काम गेल्या सात वर्षापासून रखडले आहे. व भुसंपादन केलेल्या शेतकऱ्यांचा मोबदला ही मिळाला नसल्याने त्यांनी अंदोलनाचा इशारा दिला होता. आज त्यासाठी जत तहसिल कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण होणार होते. मात्र सोमवारी तहसिलदार अभिजित पाटील यांनी अंदोलन शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली. त्यात या गावाचा भुसंपादन प्रस्ताव संपादन मंडळाकडून या कार्यालयास प्राप्त झाला आहे. कारवाई प्रगतीवर आहे. भुसंपादनाचे रक्कम लवकरात लवकर देण्याची दक्षता आम्ही घेत आहोत. असे पत्र दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले आहे, मात्र प्रशासनाकडून तातडीने कारवाई करून भुसंपादन झालेल्या शेतकऱ्यांचा मोबदला व तलावचे  रखडलेले काम पुर्ण करावे असे संरपच दिपक लंगोटे यांनी सांगितले.

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.