जतच्या मनरेगाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी कॉग्रेसच्या शिष्टमंडळांनी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

0

जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील पंचायत समितीच्या माध्यमातून झालेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून झालेल्या कामाची उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून तपासणी करूनच बिल द्यावित,अन्यथा कॉग्रेस कडून अंदोलन करण्यात येईल असे निवेदन कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांच्या मार्गदर्शनाखाली कॉग्रेसच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्याच्या शिष्टमंडळांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांना दिले.

जत तालुक्यात मनरेगातील मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. अनेक गावात कामे न करता,मंजूर दाखवून मशिनद्वारे कामे केली आहेत. अशा बोगस कामातून शासनाच्या कोट्यावधीच्या निधीवर डल्ला मारला आहे. घोटाळ्यानंतर अनेक कामाचे बिले अडल्याचा बागुलबुव्वा सुरू आहे. त्यांची बिले द्यावीत म्हणून कुलपे ठोकण्याची भाषा काही जणांकडून होत आहे. मात्र कोणत्याही कामाची थकीत बिले देण्याअगोदर त्या कामांची किंबहुना जत तालुक्यातील मनरेगातून झालेल्या सर्वच कामाची उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून चौकशी करावी अशी मागणी यावेळी शिष्टमंडळांकडून करण्यात आली आहे. यावेळी जि.प.सदस्य,महादेव पाटील,सौ.कलावती गौरगुंड,पं.स.सदस्य,रविंद्र सावंत,आप्पा मासाळ,दिग्विजय चव्हाण,दर्याप्पा हतळळी,अॅड. अडव्यापा घेरडे,सौ.अश्विनी चव्हाण,अर्चना पाटील,लत्ता कुळोळी,सह सर्व पदाधिकारी उपस्थित होंते.

Rate Card

जतच्या मनरेगाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी या मागणीचे निवेदन देताना कॉग्रेस नेते विक्रम सांवत, महादेव पाटील, रविंद्र सांवत दिग्विजय चव्हाण आदि

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.