चंदन वृक्षलागवडीची चळवळ मजबूत करा :डाॅ. महेंद्र घागरे

जत(वार्ताहर): चंदन वृक्षलागवडीतून पर्यावरण संरक्षणाबरोबरच वैयक्तिक नफा मिळवून शेतकऱ्यांनी सक्षम व्हावे,”हरित मित्र” परिवारांतर्फे हि चळवळ उभी केली आहे. जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात चंदन वृक्षलागवड करून चळवळ मजबूत करावी, असे प्रतिपादन डाॅ. महेंद्र घागरे यांनी केले. ते राजे रामराव महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीरात ‘चंदन वृक्षलागवड’ या विषयावर मार्गदर्शन करताना बोलताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डी. एस. कुंभार हे होते. डाॅ. घागरे पुढे म्हणाले, चंदन हा महत्वाचा कल्पवृक्ष असल्याने ‘हरित मित्र परिवार’ गेली 15 वर्ष मोफत रोपवाटप, लागवड व सामुहिक शेतीसाठी मार्गदर्शन महाराष्ट्र व इतर राज्यातही करीत आहे. गेल्या 15 वर्षात 16 ते 18 हजार हेक्टर चंदनाची लागवड ‘हरित मित्र परिवारा’ तर्फे झाली आहे. तरी सर्वांनी या चंदन वृक्षलागवड चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी पुत्रंजीव व चंदनाच्या बियांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. कार्यक्रम अधिकारी डाॅ. राजेंद्र लवटे, डाॅ. भिमाशंकर डहाळके, प्रा. कृष्णा रानगर, सर्व सदस्य, स्वयंसेवक-स्वयंसेविका उपस्थित होते.
