नियोजित संख तालुका ठिकाण असुविधाच्या गर्देत. अल्पशा निधीत उपाययोजनाला मर्यादा; स्वतंत्र विशेष निधी गरज

0

संख,(वार्ताहर) जत तालुक्यातील संख भविष्यात तालुका होणारे गाव असुविधाच्या गर्देत सापडले आहे. ग्रामपंचायतीचा अपुरा निधी सर्वच उपाययोजना करू शकत नसल्याने विशेष योजनेतून निधी देऊन सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी होत आहे.जतचे आमदार विलासराव जगताप भाजपचे

आहेत.जतच्या सर्वागिंन विकासासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. शिवाय देश,राज्यात भाजप सरकार,जिल्हा परिषद,पंचायत समिती,ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता असल्याने संखचा झपाट्याने विकास साधला जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.त्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पाठपुरवा कायम ठेवून योजना खेचून आणणे महत्वपुर्ण आहे. 

 जत तालुक्यातील विस्तार मोठा असल्याने भविष्यात जत तालुक़्याचे विभाजन होणार असल्याने संखलाच प्राधान्य दिले जाण्याची शक्यता अाहे. विभाजना अगोदरची तात्पुरती सोय म्हणून अतिरिक्त तहसिल कार्यालय संखला मंजूर झाले आहे. ते कधीही होऊ शकते. त्यामुळे लोकांची संखला ये-जा वाढणार आहे. त्या मानाने सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. किंबहुना तालुका विभाजन झाल्यास संख तालुका होणार आहे. त्यादृष्टीने संखमध्ये सोयी सुविधा असणे गरजेचे आहे.परंतु अपुऱ्या गटारी,अतर्गंत रस्ते डाबंरीकरण,सुसज्ज कार्यालये , बसस्थानक,भविष्यात परिसरातील साठवर गावातून येणाऱ्या लोकाची सोय होईल अशी सुविधा निर्माण करणे संख ग्रामपंचायतीसमोर आवाहन आहे. ग्रामपंचायतीला उपलब्ध निधीतून ह्या सुविधा उभ्या करण्यासाठी मर्यादा पडत असल्याने शासनाने स्वतंत्र निधी देऊन संख सुविधा युक्त करावे.यापुर्वीही ग्रामपंचायत प्रशासनाकडून उपाययोजना करताना दर्जा बघितला गेला नाही, खाऊ धोरणामुळे यापुर्वीही म्हणावा तसा विकास झाला नसल़्याचा ग्रामस्थाचा अारोप आहे. अगोदर छोटे,छोटे अतर्गंत मार्ग,व त्यातूनच गटारी,अनेक रस्ते डांबरीकरण नाहीत. ग्रामस्थांनीही मनाप्रमाणे रस्त्यावर डिगारे तयार केलेत. यामुळे छोटे,मोठे अपघात,सतत किरकोळ वादही घडतात. त्यामुळे मोठ्या उपाययोजनाच संखचा चेहरामोहरा बदलू शकतील अशी सध्याची स्थिती आहे

Rate Card
  • चौकट 
  • संखला जोडणारे चारही बाजूचे रस्ते अल्पशा पाऊसाने दलदल युक्त होतात.संख स्टँडनजिकचे काही डांबरीकरणाचे रस्ते वगळता इतर गावांना जोडणारे पक्के रस्ते  करणे गरजेचे आहे.पाऊसात प्रवाशाना उभे राहण्यासाठी बसस्थानकही नाही. प्रशासनाचे दुर्लक्ष,लोकप्रतिनिधीचा नाकर्तेपणा या स्थितीला कारणीभूत आहे.

संखच़्या विकासासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना सुरू आहेत.ग्रामपंचायत स्तरावर विकास कामे करून मोठ्या प्रमाणात कामे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.भविष्यातील संखचा विचार करता यापुढे विकासकामे राबविणे गरजेचे आहे. तशा पध्दतीने आम्हीही नियोजन करत आहोत. आमदार विलासराव जगताप यांच्या माध्यमातून तालुका,जिल्हा,राज्यस्तरावरून निधी आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. संखची मजबूत ओळखं निर्माण करण्यासाठी आमचे प्रतिनिधी काम करत आहेत. भविष्यात विकासप्रवाहात आलेले संख दिसेल.
आर. के. पाटील, माजी सभापती, पंचायत समिती,जत

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.