बेकायदा दारू विकणाऱ्या चार अड्ड्यावर उमदी पोलिसाचा छापा

0

उमदी,वार्ताहर:उमदी पोलिस ठाणे हद्दीतील उटगी बालगांव उमदी येथे बेकायदा देशी दारूची विक्री करणाऱ्या चार अड्यावर छापा टाकून 3 हाजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

    या प्रकरणी उमदी पोलिसानी दिलेली माहिती अशी, साबु इरगोंडा करजगी (रा उटगी) हा बनावट पावडरयुक्त शिंदीची विक्री करताना पोलिसांनी रंगेंहात पकडले.सिदराय सिद्दाप्पा कोळी (रा.उटगी) हा अवैद्य देशी दारू विकताना सापडला असून त्याच्या कडून 1,020 रुपयाचा माल जप्त केला आहे. मल्लिकार्जुन परगोंड तेलसंग (रा. बालगांव) यांचे कडील 900 रुपयाची बेकायदा देशी दारू जप्त केली. उमदी येथील प्रकाश गणपती पवार यांच्यावर कारवाई करत 660 रुपयाची देशी दारू जप्त केली आहे. सर्वाविरोधात उमदी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Rate Card

      एकाच दिवशी चार ठिकाणी छापा टाकुन अवैद्य धंद्याविरुद्ध कारवाई केल्याने अनेक अवैद्य धंदेवाल्याचे धाबे दणाणले आहे.सपोनि भगवान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  पो हे तानाजी भोसले नितिन पलुसकर सचिन आटपाडकर दिघे व राजाराम शेंडे यांनी कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.