गौण खनिजातून 2 कोटी 89 लाखाचा महसूल वसूल तहसिलदार अभिजित पाटील : धडक कारवाईने वाळू तस्करी रोकण्यात यश

0

जत,प्रतिनिधी : जत महसूल विभागाकडून गौण खनिज रॉयल्टीमधून 2 कोटी 89 लाख रुपयाचे रक्कम वसुली करण्यात आली आहे. त्यात वाळू,मुरूम,दगड व शासकीय रॉयल्टीचा समावेश आहे.अवैद्य वाळू वाहतूक करणारी

वाहने जप्त करून 90 लाख रुपयाचा दंडही वसुल केला असल्याची माहिती तहसिलदार अभिजित पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.

जत तालुक्यातील वाळू तस्करी पुर्ण बंद करण्यात महसूल विभाग यशस्वी झाला आहे. जिल्हाधिकारी काळमपाटील,प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार तालुक्यात वाळू तस्करी रोकण्यासाठी दोन पथके नेमण्यात आली आहे. सध्या ऑनलाईन कामे सुरू आहेत. त्यामुळे कर्मचारी कमी आहेत. तरीही मी स्वत: नायब तहसिलदार,सर्कल तलाठी व कोतवालाच्या माध्यमातून विविध ठिकाणी छापामारी करत आहोत. वाळू तस्कर आमच्या बंगल्यापासून वॉच ठेवून असतात.कर्मचारी कमतरता,एकच वाहन, जतपासून लांबचे आंतर व मोठ्या प्रमाणात असणारे रस्ते, त्यामुळे काही मर्यादा पडत आहेत. मात्र तस्कराच्या पुढच्या उपाययोजना करून आम्ही तालुक्यातील वाळू तस्करी मोठी प्रमाणात रोखली आहे.तालुक्याला दिलेले महसुली कोटा 4 कोटी वीस लाख आम्ही पुर्ण केला आहे. जिल्हात महसूल गोळा करण्यात आम्ही प्रथम आहोत.गेल्या आठवड्यात उमदी येथे वाळू तस्करी विरोधात कारवाई करून 5 ट्रक,दोन टॅक्टर जप्त करत तेरा लाख रुपयाचा दंड केला आहे. दररोज आम्ही छापा करत आहोत.त्यामुळे वाळू तस्करी रोकण्यात आम्हाला यश मिळाले असल्याचे तहसिलदार अभिजित पाटील यांनी सांगितले.

Rate Card

चौकट 

वाळू तस्करी रोकण्यात जत महसूल विभाग आक्रमक झाला आहे. त्यासाठी दोन पथके चौविस तास कार्यरत राहणार आहेत.उमदी व संख परिसरात हि दोन पथके चौविस तास छापामारी करणार आहेत.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.