जत,प्रतिनिधी : कुंभारी(ता.जत) येथे आयोजित विविध शालेय क्रिडा स्पर्धांचे उद्घाटन अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे अॅड. प्रभाकर भाऊ जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले.शालेय स्तरावर मैदानी खैळाचे तयारी व्हावी. यानिमित्ताने शालेय जीवनातून मुलांनी तंदुरूस्थ व्हावे या उद्देशाने शालेय स्तरावर विविध स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले जाते. यंदाच्या स्पर्धेचा उद्घाटन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी कुंभारी केंद्रातील सर्व शाळा,सर्व शिक्षक स्टाफ त्याचबरोबर कुंभारी येथील ग्रामस्थ विविध मान्यवर मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना
शालेय स्तरावरच्या या स्पर्धातून राज्य,देश पातळीवरचे खेंळाडू तयार होत असतात. त्यामुळे या स्पर्धाना मोठे महत्व आहे. विद्यार्थी दशेपासून नैसर्गिक खिलाडू वर्ती निर्माण होण्यासाठी अशा स्पर्धा व्हाव्यात. विद्यार्थ्यानीही अशा स्पर्धात जास्तीत जास्त सहभागी होत. उत्तुंग यश मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत.अशा स्पर्धा आयोजन करून ग्रामीण भागातील खेंळाडूंना व्यासपीठ तयार होत आहे. अॅड. प्रभाकर जाधव









