अलकुड एस : अभिनव फौंडेशन संचलित,मोहन माळी इंटरनॅशनल स्कूल मध्ये वार्षिक क्रिडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन कवठेमहांकाळचे नायब तहसीलदार नागेशजी गायकवाड ,व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन (दादा) माळी यांच्या हस्ते सरस्वती पूजन व क्रीडा ज्योत प्रजवलीत करून करण्यात आले.यातखो-खो ,कब्बडी ,रनिंग ,रिले ,उंचउडी ,लांबउडी ,थाळीफेक,
गोळाफेक ,लिंबुचमचा,बेडूक उड्या, संगीत खुर्ची,इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या ,उद्घाटन समारंभावेळी मुलांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.स्पर्धेच्या उद्घाटनवेळी चिमुकल्या मुलांनी अप्रतिम नृत्य सादर केले.त्रिशूल हाऊस,अग्नी हाऊस,आकाश हाऊस,पृथ्वी हाऊस संघाच्या मुलांनी पाहुण्यांचे स्वागत लेजिम व झांजपथकाच्या निदनात केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोमीन सर यांनी केले.क्रीडाशिक्षक अमर पाटील व सर्व शिक्षकांनी स्पर्धेसाठी मुलांची तयारीसाठी कष्ठ घेतले. तसेच या संपूर्ण दिमाखदार क्रीडा सोहळ्याची दमदार तयारी स्कुलच्या सर्व स्टाफने केली कार्यक्रम प्रसंगी सर्व पालकवर्गही आवर्जून उपस्थित होते.या कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ. कविता मेहरा,अडमीन सचिन कदम,सहायक व्यवस्थापक सचिन चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.
मोहन माळी इंटरनॅशल स्कूलमधील वार्षिक क्रिडा स्पर्धेतील एक क्षण











