जतच्या सिध्दीविनायक पतसंस्थेच्या कार्यालयाचा बुधवारी उद्घाटन सोहळा
जत,प्रतिनिधी : डफळापूर येथील श्री. दत्त पतसंस्थेच्या सलग्न असलेल्या श्री. सिध्दीविनायक ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था जतच्या नव्या कार्यालयाचा वास्तू प्रवेश सोहळा बुधवार ता.3 जानेवारी 2018 ला सकाळी 11 वाजता, मार्केट यार्ड गाळा नंबर 63-64 विजापुर रोड, येथे कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांच्या हस्ते व सांगली शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील,जिल्हा बँक संचालक विक्रम सांवत, नगराध्यक्ष शुंभागी बन्नेनावर आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.
जत शहरातील गरजूं व्यापाऱ्यांना कर्जरूपी मदतीचा हात देणाऱ्या सिध्दीविनायक पतसंस्थेने जत शहरात अल्प काळात वेगळा ठसा उमटविला आहे. डफळापूरच्या दत्त पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी यांच्या खुशल मार्गदर्शनाखाली संस्थेचा स्वच्छ,पारदर्शी कारभार संस्थेचा नावलौकिक वाढवत आहे.

त्या पंतसस्थेचे प्रशासकीय कार्यालय नविन वास्तूत स्थंलातर होत आहे. या सुवर्ण सोहळ्यास उपस्थित राहून आपला आशिर्वाद द्यावा असे आवाहन चेअरमन अजित भोसले,व्हाय.चेअरमन प्रविण पाथरूट यांनी केले.
