डॉ. देवयानी गावडे यांचा “आदर्श धन्वंतरी” पुरस्काराने गौरव
जत,प्रतिनिधी : कॉग्रेस सेवादल सांगलीच्या वतीने देण्यात येणारा 2017 चा आदर्श धन्वंतरी पुरस्कार जत पश्चिम भागातील महिलासाठी काम करणाऱ्या,माजी उपसभापती डॉ. देवयानी गावडे यांना देण्यात आला.भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्म भूषण डॉ . वसंतदादा पाटील यांच्या जन्म शताब्दी निमित्त आयोजित सांगली जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने कॉग्रेस सेवादल पुरस्कार 2017 “आदर्श धन्वंतरी पुरस्कार” जत पश्चिम भागातील महिलांचे आशास्थान जत पंचायत समितीच्या माजी उपसभापती डॉ.सौ.देवयानी साहेबराव गावडे यांना विष्णूदास भावे नाट्यगृह सांगली येथे नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष व खासदार आय जी. सनदी यांच्या हस्ते व अजित ढोले (जिल्हा काँग्रेस सेवादल प्रमुख)आनंदराव मोहिते (माजी जिल्हा अध्यक्ष काँग्रेस),आ.आनंदराव पाटील,विजय कडणे यांच्या प्रमुख उपस्थिती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. गावडे ह्या खा. संजय पाटील, आ. विलासराव जगताप, भाजप नेते डॉ. रविंद्र आरळी, डॉ. अनिल मडके यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. देवयानी गावडे वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. समाजासाठी निस्वार्थपणे काम करत असताना त्यांना जत पंचायत समितीच्या उपसभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्या माध्यमातून त्यांनी समाजहिताची कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत.1994 पासून वैद्यकीय सेवा करत त्यांनी समाजहिताच्या कामात मोठे योगदान दिले आहे. गेली तेविस वर्ष त्या जनस्वास्थ संघटन सांगलीच्या वतीने डफळापूरात सामाजिक कार्यात जनसेवा करत आहेत. सामाजिक, कला,क्रिडा,सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, वृक्षारोपन,योगा आदि क्षेत्रात त्यांच्या कामाचा ठसा उमटविला आहे. तनिष्का गटाचूनही त्यांनी महिलांचे संघटन करून महिलासाठी काम केले आहे.