बोगस डॉक्टर प्रोनोय मल्लीक याला पाच दिवसाची पोलिस कस्टडी

0

जत,प्रतिनिधी : डफळापूर ता.जत येथील बोगस डॉक्टर प्रोनोय परिमल मल्लीक वय-35 याला रुग्णावर उपचार करताना रंगेहाथ तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने पकडले. पोलिस बंदोबस्तात हि कारवाई 

करण्यात आली.दरम्यान शुक्रवारी मल्लीक याला जत न्यायालयात उभे केले असता, न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कस्टडी सुनावली.मल्लीक यांच्यावर हा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे.

Rate Card

डफळापूर येथे प्रोनोय मल्लीक हा कोणत्याही पदवीविना दवाखाना थाटून रूग्णावर उपचार करत होता. यापुर्वी दोन वेळा जिल्हास्तरीय पथकाने कारवाई करूनही मल्लीक दवाखाना चालवित असल्याच्या तक्रारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. डि.जी.पवार यांच्याकडे आल्या होत्या. यापुर्वी डॉ.पवार यांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मल्लीक पळून जाण्यात यशस्वी झाला होता.त्यामुळे पोलिस पथकासह गुरूवारी मल्लीक यांच्यावर छापा टाकण्यात आला. त्यात मल्लीक रुग्णावर उपचार करत असल्याचे निदर्शनास आले. छाप्यात रोख 1500रू,औषध-गोळ्या असे 4 हाजार 839 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे डॉ. डि.जी. पवार यांनी सांगितले. सतत कारवाई करूनही मल्लीक दवाखाना चालवित असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आम्ही न्यायालयाकडे विंनती अर्जाद्वारे केल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले. शुक्रवारी मल्लीक यांना तपास अधिकारी पिएसआय रणजित गुंडरे यांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवस पोलिस कस्टडी सुनावली. आतापर्यतच्या कारवायात पहिल्याच घटनेत बोगस डॉक्टरांला पाच दिवसाची पोलिस कस्टडी सुनावली असल्याने यापुढे अशा बोगस डॉक्टरांना आळा बसेल असेही डॉ. पवार यांनी सांगितले. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.