पंचायत समिती मासिक बैठकीत मनरेगा बिलावरून जोरदार खडाजंगी

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील मनरेगा घोटाळा मुळे अडकलेली बिले व नविन कामे सुरू करण्याच्या मागणीवरून गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे व आमदार पुत्र मनोज जगताप यांच्यात खंडाजगी झाली. जुन्याची बिले काढून नविन कामे सुरू करा. अशी मागणी जगतापसह अन्य सदस्यांनी केली. जुन्या कामातील काळाबाजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बैठकीत मांडली,त्यातिल बोगसगिरीचा पाडाच सदस्यासमोर वाचला. अखेर नविन कामे करण्याचा ठराव करण्यात आला.

जत पंचायत समितीची मासिक बैठक येळवी (ता.जत) येथील समर्थ हायस्कूलमध्ये झाली. सभेत गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डि.जी. पवार,उपअभियंता शिवानंद बोलीशेट्टी,सदस्य मनोज जगताप, अॅड.आडव्याप्पा घेरडे,दिग्विजय चव्हाण, श्रीदेवी जावीर उपस्थित होते.

Rate Card

बैठकीतील प्रमुख विषय संपल्यानंतर सदस्य मनोज जगताप यांनी मनरेगाचा विषय मांडला.वरिष्ठांनी सुचना देऊनही बिडिओ मनरेगाची थकलेली बिले वर्षापासून दिली जात नाहीत.नविन कामे नाहीत, त्यामुळे बिडिओना कार्यमुक्त करण्याचा ठराव करावा असे मत मांडले.

यावर बिडिओना टोणपे उद्गिन्न होत म्हणाले,हि योजना मजूरांपेक्षा ठेकेदारासाठी महत्वाची आहे का? मजूरांची मागणी नसताना केवळ ठेकेदारी पोसण्यासाठी मनरेगाचा वापर केला जात आहे. मनरेगातून कुणाचे भले झाले हे जगजाहीर आहे.बिडिओना जेलमध्ये जावे लागले त्यावेळी कुणीही पुढे आले नाही. त्यांच्या बायकांनी जामीन दिले. जुन्या कामाचे पैसे द्या म्हणून सांगतात. पंरतू एकाही कामाची कागदपत्रे व्यवस्थित नाहीत. कशाच्या आधारे बिले द्यायची असा सवाल केला. यावर सदस्यही चांगलेच भडकले श्रीदेवी जावीर, जगताप,रविंद्र सांवत यांनी ठेकेदारीला आक्षेप घेतला.शेतकऱ्यांनी कर्जे काढून कामे केली आहेत. बिले दिली पाहिजेत. यावर सीईओंनीही बिले द्या म्हणून सांगितले आहे. तरीही बिले दिली जात नाही. तुम्ही का टाळाटाळ करताय असा सवाल जावीर,जगताप यांनी केला.गोठा तपासणी पथकाचा अहवाल आला नसल्याचे टोणपे यांनी सांगितले. पथकातील अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता,अनेक धक्कादाक प्रकार समोर आले. एका अधिकाऱ्यांने सांगतिले,गोठ्याचे एकही काम एबीप्रमाणे नाही.त्या अनेक त्रुटी आहेत. जुने एबी रद्द केल्याशिवाय नवे करता येणार नाही.रद्द करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. अन्य एका अधिकाऱ्यांनी सांगितले, एकाच कुंटुबात अनेक गोठे मंजूर झालेले आहेत. दोन जनावरे, गोठे चार असाही प्रकार आहे. गोठ्याची कामात कोणताही निकष पाळला नसल्याचे समोर येताच सदस्यांची बोलती बंद झाली. नविन वैयक्तिक कामे सुरू करण्याबाबत कारवाई करू,मात्र जुन्या कामात अनेक त्रुटी आहेत. त्याबाबत निर्णय जिल्हा पातळीवरून घ्यावा, सभागृहाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसे पत्र द्यावे असे गटविकास टोणपे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.