जत पश्चिम भागात महावितरण विरोधात आक्रोश सर्व पक्षीय नेते,शेतकऱ्यांनी दिलेल्या अंदोलनाचा इशारानंतर महावितरणची तलवार म्यान : अखेर विजपुरवठा जोडला

0

जत,प्रतिनिधी : महावितरणच्या डफळापूर सब टेशन शेतीपंपांची थकीत बिले वसुलीसाठी अऩ्यायकारक मोहिम राबवत अख्या डिपीचा विज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली होती. सोमवार पर्यत सुमारे 12 डिपीचा विजपुरवठा तोडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांत प्रंचड खळबंळ माजली होती. महावितरणच्या विरोधातील आक्रोशाला अखेर मंगळवारी दैंनिक संकेत टाइम्सने वाचा फोडली. माजी सभापती मन्सूर खतीब यांच्या अऩ्यायकारक कारवाई थांबवा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू या इशाऱ्यानंतर महावितरणला जाग आली. संकेत टाइम्सचे कात्रणे तालुक्यातील अधिकाऱ्यांनी राज्यातील अधिकाऱ्यांच्या पर्यत पोहचवत कारवाई मुुुुळे उद्रेेक होऊ शकतो असा संदेश वॉटस्अप द्वारे पोहचविला. त्यावर विचार विनमय झाला. सध्याची परिस्थिती नुसार तालुका स्तरावरून तात्पुरती कारवाई थांबविण्यात आली. मात्र तोडलेल्या डिपीचा विजपुरवठा जोडला नव्हता. त्यामुळे गुरूवारी शेतकरी, राजकीय पक्षाच्या नेत्यानीं रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. तशी निवेदन संबधीत यंत्रणा,तहसिलदारांना दिली. जनआक्रोश भडकण्या अगोदर महावितरणने विजपुरवठा खंडित करण्याची तलवार अखेर म्यान करत गुरूवार पासून तोडलेल्या डिपीचा विज पुरवठा सुरू केला आहे. सध्यस्थितीत कुडणूर 3,जिरग्याळ 3, बाज 2 अशा डिपीचा विज पुरवठा जोडण्यात आला आहे. शुक्रवारी डफळापूरातील डिपीचा पुरवठा जोडण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. महावितरणच्या अचानक उद्भविलेल्या या कारवाईत शेतकरी कमालीचा हबकला होता. मुळात गेल्या तिन-चार वर्षात पिकेच आली नसल्याने बिल भरता आली नव्हती. यावर्षी पावसाने साथ दिल्याने पिके चांगली, अगदी हातातोंडाला आली आहेत. यातिल उत्पनातून काही प्रमाणात बिले भरणे शक्य आहे. मात्र अचानक विजपुरवठा तोडण्याच्या प्रकाराने शेतकरी विवंचनेत होत्या. आता रस्त्यावर उतरण्याचा शिवाय पर्याय नसल्याने तशी तयारी सुरू झाली होती. निवेदने देण्यात आली होती. परिस्थिती भहवाहता बघत महावितरणने कारवाई काही दिवसासाठी थांबविली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. गुरूवारी अंदोलनची विविध राजकीय पक्षाकडून निवेदने देण्यात आली. त्यात पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी कॉग्रेसच्या वतीने, सुनिल छत्रे, बंडू चव्हाण सर यांनी आरपीआयच्या वतीने तर दिनकर संकपाळ यांनी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोकोचा इशारा दिला आहे. परिस्थिती काहीशी चांगली आहे. पिके आली तर शेतकरी बिले भरतील,त्याअगोदरची हि कारवाई थांबवा अशी मागणी सर्वांनी केली आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.